बेळगाव जिल्हा कराटे संघटनेचे यश
बेळगाव : शिमोगा इनडोअर स्टेडियम येथे सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वतीने घेण्यात आलेल्या 14 वर्षाखालील आणि 17 वर्षाखालील विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत बेळगाव जिल्हा कराटे संघटनेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले. शिमोगा येथे घेण्यात आलेल्या स्पर्धेत विजेत्या कराटेपटूंची नावे :- गणेश पाटीलला सुवर्णपदक,श्रीधर कदम – सुवर्ण, इशान करगुप्पीकर – सुवर्ण, माही कंग्राळकर – सुवर्ण, निरीक्षा श्रीरामूदु-रौप्य, शुभश्री मिराशी – रौप्य, मंजिरी जीबी – रौप्य, मधु पाटील-रौप्य, प्राची गावकर – रौप्य, श्रध्दा पाटील -रौप्य, आदित्य तळवार- रौप्य पदक पटकाविले. वरील सुवर्णपदक विजेते विद्यार्थ्यांचे दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी कर्नाटक संघात निवड झाली आहे. 19 वर्षाखालील कॉलेज गटात -आदित्य काकतकर-सुवर्ण, किशन तेंगीनकेरी – रौप्य पदक पटकाविले. हे विद्यार्थी पंजाब येथे होणाऱ्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. वरील सर्व विजेत्या कराटेपटूंना बेळगाव जिल्हा स्पोर्ट्स कराटे असोसिएशन प्रशिक्षक गजेंद्र काकतीकर, रमेश अलगुडेकर, जितेंद्र काकतीकर, दिपक काकतीकर, परशुराम काकती, विठ्ठल भोजगार, हरीष सोनार आणि अक्षय परमोजी या सर्वांचे मार्गदर्शन लाभत आहे.
Home महत्वाची बातमी बेळगाव जिल्हा कराटे संघटनेचे यश
बेळगाव जिल्हा कराटे संघटनेचे यश
बेळगाव : शिमोगा इनडोअर स्टेडियम येथे सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वतीने घेण्यात आलेल्या 14 वर्षाखालील आणि 17 वर्षाखालील विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत बेळगाव जिल्हा कराटे संघटनेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले. शिमोगा येथे घेण्यात आलेल्या स्पर्धेत विजेत्या कराटेपटूंची नावे :- गणेश पाटीलला सुवर्णपदक,श्रीधर कदम – सुवर्ण, इशान करगुप्पीकर – सुवर्ण, माही कंग्राळकर – सुवर्ण, निरीक्षा श्रीरामूदु-रौप्य, शुभश्री […]