बालिका आदर्शच्या कुस्तीपटूंचे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत यश

गोवा येथे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन बेळगाव : गोवा येथे राष्ट्रीय खेल प्राधिकरण, टीएएफआयएसए,आयएकेएस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत बेळगावच्या बालिका आदर्श कुस्ती संकुलनच्या कुस्तीपटूंनी घवघवीत यश संपादन केले आहे. म्हापसा येथील पेडम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स गोवा येथे आयोजित कुस्ती स्पर्धेत बेळगाव येथील बालिका आदर्श कुस्ती संकलनातील महिला कुस्तीपटूंनी विविध वजनी गटात यश मिळविले आहे. या स्पर्धेत […]

बालिका आदर्शच्या कुस्तीपटूंचे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत यश

गोवा येथे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन
बेळगाव : गोवा येथे राष्ट्रीय खेल प्राधिकरण, टीएएफआयएसए,आयएकेएस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत बेळगावच्या बालिका आदर्श कुस्ती संकुलनच्या कुस्तीपटूंनी घवघवीत यश संपादन केले आहे. म्हापसा येथील पेडम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स गोवा येथे आयोजित कुस्ती स्पर्धेत बेळगाव येथील बालिका आदर्श कुस्ती संकलनातील महिला कुस्तीपटूंनी विविध वजनी गटात यश मिळविले आहे. या स्पर्धेत बेळगाव, गोवा, केरळ, आंध्रप्रदेशातील स्पर्धकांनी भाग घेतला होता. यात महिलांमध्ये प्रांजल बिर्जे 25 किलो, रिदान काकतीकर 20 किलो, समिधा बिर्जे 30 किलो, आराध्या हलगेकर 32 किलो, मनस्वी मायाण्णाचे 35 किलो, आदिती कोरे 40 किलो, ऋतुजा रावळ 42 किलो, शितल सुतार 46 किलो, राधिका बैलुरकर 55 किलो, समीक्षा धामणेकर 56 किलो, कल्याणी अंबोळकर 67 किलो तर मुलांच्या गटात गगन पूनजगौडा 28 किलो, संग्राम गावडा 32 किलो यांनी विविध वजनी गटात यश मिळवित प्रथम क्रमांकासह सुवर्ण पदक मिळवून यश संपादन केले. त्यांना राष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक मारुती घाडी, क्रीडा शिक्षक उमेश बेळगुंदकर, मुख्याध्यापक मंजुनाथ गोलीहळ्ळी, मुख्याध्यापक एन. ओ. डोणकरी, संस्थेचे सदस्य ए. एल. गाडगीळ यांचे मार्गदर्शन लाभत आहे. या यशामुळे कुस्तीपटुंचे सर्वत्र कौतुक होत आहे.