चोरीस गेलेले दहा मोबाईल परत मिळविण्यात यश
माळमारुती पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
बेळगाव : गेल्या सहा महिन्यात माळमारुती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातून हरवलेले दहा मोबाईल पोलिसांनी परत मिळविले आहेत. उत्तर भारतातील अनेक राज्यातून चोरीचे मोबाईल मागवून संबंधितांना परत करण्यात आले आहेत. माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक व्हन्नाप्पा तळवार, गुन्हे तपास विभागाचे पोलीस उपनिरीक्षक श्रीशैल हुळगेरी, शिवाजी चव्हाण, महेश मळली आदींनी सतत पाठपुरावा करून चोरीचे मोबाईल परत मिळविले आहेत. बिहार, राजस्थान, उत्तर प्रदेश आदी राज्यांत चोरीचे मोबाईल विकण्यात आले होते. तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांचा शोध घेऊन ते बेळगावला मागविण्यात आले आहेत. विविध कंपन्यांचे दहा मोबाईल संबंधितांना परत करण्यात आले आहेत.
Home महत्वाची बातमी चोरीस गेलेले दहा मोबाईल परत मिळविण्यात यश
चोरीस गेलेले दहा मोबाईल परत मिळविण्यात यश
माळमारुती पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी बेळगाव : गेल्या सहा महिन्यात माळमारुती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातून हरवलेले दहा मोबाईल पोलिसांनी परत मिळविले आहेत. उत्तर भारतातील अनेक राज्यातून चोरीचे मोबाईल मागवून संबंधितांना परत करण्यात आले आहेत. माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक व्हन्नाप्पा तळवार, गुन्हे तपास विभागाचे पोलीस उपनिरीक्षक श्रीशैल हुळगेरी, शिवाजी चव्हाण, महेश मळली […]
