इतरांपेक्षा वेगळा विचार केल्यास यश!

राष्ट्रीय बालिका दिन कार्यक्रमात मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे प्रतिपादन बेळगाव : राज्यात मुलींचे शिक्षण, आरोग्य व सुरक्षिततेवर सरकारने अधिक भर दिला आहे, अशी माहिती महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली. जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महिला व बालकल्याण खाते, जिल्हा बालसंरक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय बालिका दिन कार्यक्रमात त्या बोलत […]

इतरांपेक्षा वेगळा विचार केल्यास यश!

राष्ट्रीय बालिका दिन कार्यक्रमात मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे प्रतिपादन
बेळगाव : राज्यात मुलींचे शिक्षण, आरोग्य व सुरक्षिततेवर सरकारने अधिक भर दिला आहे, अशी माहिती महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली. जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महिला व बालकल्याण खाते, जिल्हा बालसंरक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय बालिका दिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री म्हणून केलेल्या कामाचे आपल्याला समाधान आहे. हे खाते इतर खात्यांपेक्षाही वेगळे आहे. माणसासाठी माणुसकीने काम करणारे हे खाते आहे. म्हणून महिलांच्या भावना समजून घेऊन काम करणे आपल्याला शक्य झाले. प्रत्येकाने परस्पर प्रेम, विश्वास व बंधुभावाने जीवन जगावे. यासंबंधी पालकांनी आपल्या मुलांना शिक्षण देण्याची गरजही त्यांनी बोलून दाखविली. जीवनात कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाताना मुलींनी माघार घेऊ नये. प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवावा. जीवनात काही तरी चांगले करून दाखविले पाहिजे. आपल्या जन्मदात्यांची मान उंचावेल, अशी कामगिरी केली पाहिजे. जीवनात यश मिळविले पाहिजे. केवळ शिक्षण हेच मुख्य नाही. जीवनाचे धडेही घेतले पाहिजेत. अशाप्रकारे इतरांपेक्षा वेगळा विचार केला तरच यश मिळविणे शक्य आहे, असेही लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. यावेळी जिल्हा बालसंरक्षण अधिकारी महांतेश बजंत्री, युवराज कदम, बाळू देसूरकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मुलींशी गप्पा मारल्या. लहान मुलांशी संवाद साधला. मिठाई खाऊ घालून त्यांनी आनंद व्यक्त केला.