स्मार्ट सिटीअंतर्गत दर्जाहीन कामे
सहा महिन्यांतच पेव्हर्सचा दर्जा उघडकीस
बेळगाव : स्मार्ट सिटीअंतर्गत शहरातील रस्ते, गटारी, पदपथ, तसेच इतर कामे करण्यात आली. मात्र पहिल्याच पावसाने या कामांचा दर्जा उघडा पाडला. गोवावेस सर्कल येथील एलआयसी कार्यालयासमोरील पदपथाचे पेव्हर्सचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून त्यामधील अनेक पेव्हर्स पावसाने वाहून गेले आहेत. या प्रकारामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. गोवावेस सर्कलचे काम अलीकडेच करण्यात आले आहे. स्मार्ट सिटीअंतर्गतच डांबरी रस्ता करण्यात आला. केवळ एकच वर्षात तो रस्ता खराब झाला. त्यानंतर त्याठिकाणी पेव्हर्स बसविण्यात आले आहेत. या रस्त्याला लागून पदपथ असून त्या पदपथालाही पेव्हर्स बसविले. मात्र पहिल्याच वळिवाच्या दणक्याने पेव्हर्स वाहून गेले आहेत. या परिसरात केलेली कामे दर्जाहीन असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. याबाबत नगरसेवक रवी साळुंखे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सहा महिन्यांपूर्वी हे पदपथ दुरुस्त करण्यात आले होते. नव्याने पेव्हर्स बसविण्यात आले होते. मात्र ते पेव्हर्स वाहून गेले आहेत. स्मार्ट सिटीमधील सर्वच कामे दर्जाहीन झाल्याचे रवी साळुंखे यांनी यावेळी सांगितले. या सर्व प्रकाराची चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
Home महत्वाची बातमी स्मार्ट सिटीअंतर्गत दर्जाहीन कामे
स्मार्ट सिटीअंतर्गत दर्जाहीन कामे
सहा महिन्यांतच पेव्हर्सचा दर्जा उघडकीस बेळगाव : स्मार्ट सिटीअंतर्गत शहरातील रस्ते, गटारी, पदपथ, तसेच इतर कामे करण्यात आली. मात्र पहिल्याच पावसाने या कामांचा दर्जा उघडा पाडला. गोवावेस सर्कल येथील एलआयसी कार्यालयासमोरील पदपथाचे पेव्हर्सचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून त्यामधील अनेक पेव्हर्स पावसाने वाहून गेले आहेत. या प्रकारामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. गोवावेस सर्कलचे […]