सिंधुदुर्गात होणार पाणबुडी प्रकल्प !
स्कुबा डायव्हिंग स्कूलही होणार ; राज्याच्या अर्थसंकल्पात घोषणा
मुंबई | प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्कुबा डायव्हिंग स्कूल व वेंगुर्ले येथे पाणबुडी प्रकल्प तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे महिला उद्योग केंद्र उभारण्याची घोषणा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आजच्या अर्थसंकल्पीय अहवाल वाचनात केली आहे. त्यामुळे सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासाची वाट आता मोकळी झाली आहे .आजच्या अर्थसंकल्पात सिंधुदुर्ग जिल्ह्यसाठी तीन प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत .पाणबुडी प्रकल्प हा गुजरातला हलवण्यात आल्याच्या वावड्या उठल्यानंतर आता या अर्थसंकल्पीय अहवालात वेंगुर्ले पाणबुडी प्रकल्प मंजूर करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने कोकणवासीयांना दिलासा दिला आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या मतदारसंघात वेंगुर्ले भागात पाणबुडी हा भव्य प्रकल्प आता साकारला जाणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे जिल्हा उद्योग केंद्र ही उभारण्यात येणार आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प अहवालचे वाचन करून सिंधुदुर्ग वासियांना एक नवा दिलासा दिला आहे. नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत कोकणातून महायुतीला भरभरून प्रतिसाद मिळाला . त्यामुळे कोकणाला आणि विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्याला तीन मोठे प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत.
Home महत्वाची बातमी सिंधुदुर्गात होणार पाणबुडी प्रकल्प !
सिंधुदुर्गात होणार पाणबुडी प्रकल्प !
स्कुबा डायव्हिंग स्कूलही होणार ; राज्याच्या अर्थसंकल्पात घोषणा मुंबई | प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्कुबा डायव्हिंग स्कूल व वेंगुर्ले येथे पाणबुडी प्रकल्प तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे महिला उद्योग केंद्र उभारण्याची घोषणा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आजच्या अर्थसंकल्पीय अहवाल वाचनात केली आहे. त्यामुळे सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासाची वाट आता मोकळी झाली आहे .आजच्या अर्थसंकल्पात सिंधुदुर्ग जिल्ह्यसाठी तीन प्रकल्प […]