उपनोंदणी अधिकारी विष्णूतीर्थ पुन्हा रुजू

बेळगाव : दक्षिण विभागाचे उपनोंदणी अधिकारी म्हणून जी. विष्णूतीर्थ हे पुन्हा रुजू झाले आहेत. यापूर्वी त्यांनी बेळगाव येथे काम केले होते. एक वर्षांपूर्वी त्यांची होन्नावर येथे बदली झाली होती. त्यानंतर त्यांची पुन्हा या ठिकाणी बदली झाली आहे. त्यांनी बुधवारी या पदाची सूत्रे स्वीकारली आहेत. उपनोंदणी अधिकारी विष्णूतीर्थ गेली अनेक वर्षे बेळगावमध्ये कार्यरत होते. सर्वात जास्त […]

उपनोंदणी अधिकारी विष्णूतीर्थ पुन्हा रुजू

बेळगाव : दक्षिण विभागाचे उपनोंदणी अधिकारी म्हणून जी. विष्णूतीर्थ हे पुन्हा रुजू झाले आहेत. यापूर्वी त्यांनी बेळगाव येथे काम केले होते. एक वर्षांपूर्वी त्यांची होन्नावर येथे बदली झाली होती. त्यानंतर त्यांची पुन्हा या ठिकाणी बदली झाली आहे. त्यांनी बुधवारी या पदाची सूत्रे स्वीकारली आहेत. उपनोंदणी अधिकारी विष्णूतीर्थ गेली अनेक वर्षे बेळगावमध्ये कार्यरत होते. सर्वात जास्त सरकारला महसूल जमा करणारे अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. मात्र मध्यंतरी त्यांची बदली झाली होती. त्यानंतर पुन्हा ते बेळगाव दक्षिण उपनोंदणी कार्यालयामध्ये रुजू झाले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून उपनोंदणी अधिकारी नसल्यामुळे कामे प्रलंबित होती. बराच ताण इतर कर्मचाऱ्यांवर निर्माण झाला होता. मात्र आता उपनोंदणी अधिकारी रुजू झाल्याने प्रलंबित कामे तातडीने निकालात काढली जाणार आहेत.
उपनोंदणी अधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्याने समाधान
दक्षिण विभाग उपनोंदणी कार्यालयामध्ये उपनोंदणी अधिकारी काही महिनेच काम करत असतात. त्यानंतर त्यांची इतरत्र बदली होत असते. त्यामुळे कामे प्रलंबित राहत असतात. परिणामी तेथील कर्मचाऱ्यांवर ताण पडत असतो. उपनोंदणी अधिकारी नसल्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र आता उपनोंदणी अधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्याने अॅड. सागर खन्नुकर यांनी समाधान व्यक्त केले.