उपकनिष्ठांची राष्ट्रीय हॉकी स्पर्धा आजपासून

कोलम (केरळ) : हॉकी इंडियाच्या दुसऱ्या उपकनिष्ट पुरूष आणि महिलांच्या दक्षिण विभागीय हॉकी चॅम्पियनशीप स्पर्धेला येथे शुक्रवार दि. 19 जुलैपासून प्रारंभ होत आहे. सदर स्पर्धा 26 जुलैपर्यंत चालणार आहेत. या स्पर्धेमध्ये प्रत्येक विभागातून सहा संघांचा समावेश करण्यात आला आहे. कर्नाटका, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, पुडुचेरी व यजमान केरळ यांचा समावेश राहिल. सदर स्पर्धा राऊंड रोबिन पध्दतीने […]

उपकनिष्ठांची राष्ट्रीय हॉकी स्पर्धा आजपासून

कोलम (केरळ) : हॉकी इंडियाच्या दुसऱ्या उपकनिष्ट पुरूष आणि महिलांच्या दक्षिण विभागीय हॉकी चॅम्पियनशीप स्पर्धेला येथे शुक्रवार दि. 19 जुलैपासून प्रारंभ होत आहे. सदर स्पर्धा 26 जुलैपर्यंत चालणार आहेत. या स्पर्धेमध्ये प्रत्येक विभागातून सहा संघांचा समावेश करण्यात आला आहे. कर्नाटका, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, पुडुचेरी व यजमान केरळ यांचा समावेश राहिल. सदर स्पर्धा राऊंड रोबिन पध्दतीने खेळविली जाणार असून स्पर्धेत सहभागी झालेले सर्व संघ दुसऱ्या संघाबरोबर केवळ एकाच लढत देतील. त्यानंतर आघाडीच्या दोन संघामध्ये अंतिम सामना खेळविला जाईल. त्याच प्रमाणे तिसऱ्या स्थानासाठीचा सामना तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या संघामध्ये होईल. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी तेलंगणा आणि आंध्रप्रदेश तसेच तामिळनाडू-पुडुचेरी, केरळ-कर्नाटक यांच्या महिलांच्या विभागातील सामने होतील. पुरूषांच्या विभागात आंध्रप्रदेश-पुडुचेरी, कर्नाटक-तेलंगणा, केरळ-तामिळनाडू यांच्यात सामने खेळविले जातील.