ऑस्ट्रेलियातील विद्यार्थ्यांची काहेर नर्सिंग सायन्सेसला भेट

समन्वय करारांतर्गत माहितीचे आदानप्रदान बेळगाव : ऑस्ट्रेलिया येथील सदर्न क्रॉस युनिव्हर्सिटीच्या दहा विद्यार्थ्यांनी नुकतीच बेळगाव येथील काहेरच्या नर्सिंग सायन्सेस कॉलेजला भेट देऊन माहिती जाणून घेतली. अभ्यास दौऱ्याअंतर्गत विद्यार्थ्यांनी नर्सिंगविषयीची माहिती जाणून घेत आत्मसात केलेल्या ज्ञानाचे आदानप्रदान केले. काहेरच्या इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग सायन्सेस व ऑस्ट्रेलिया येथील सदर्न क्रॉस युनिव्हर्सिटी यांच्यामध्ये समन्वय करार झाला होता. त्यानुसार तेथील […]

ऑस्ट्रेलियातील विद्यार्थ्यांची काहेर नर्सिंग सायन्सेसला भेट

समन्वय करारांतर्गत माहितीचे आदानप्रदान
बेळगाव : ऑस्ट्रेलिया येथील सदर्न क्रॉस युनिव्हर्सिटीच्या दहा विद्यार्थ्यांनी नुकतीच बेळगाव येथील काहेरच्या नर्सिंग सायन्सेस कॉलेजला भेट देऊन माहिती जाणून घेतली. अभ्यास दौऱ्याअंतर्गत विद्यार्थ्यांनी नर्सिंगविषयीची माहिती जाणून घेत आत्मसात केलेल्या ज्ञानाचे आदानप्रदान केले. काहेरच्या इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग सायन्सेस व ऑस्ट्रेलिया येथील सदर्न क्रॉस युनिव्हर्सिटी यांच्यामध्ये समन्वय करार झाला होता. त्यानुसार तेथील विद्यार्थी माहिती घेण्यासाठी बेळगावमध्ये आले होते. यावेळी त्यांनी केएलईचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे, कुलगुरु डॉ. नितीन गंगाणे यांच्याशी संवाद साधला. केएलई विद्यापीठातर्फे सदर्न क्रॉस युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. एम. एस. गणाचारी, डॉ. गिरीशकुमार नंदगावे यासह इतर उपस्थित होते.