मराठी भाषिक वकील संघटनेतर्फे विद्यार्थ्यांचा सत्कार

तनिष्का नावगेकर व ऐश्वर्या बांदिवडेकर यांच्या पालकांचाहि केला सत्कार ► प्रतिनिधी / बेळगाव एस. एस. एल. सी. परीक्षेत जिल्ह्यामध्ये तनिष्का शंकर नावगेकर हिने 99.58 टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक घेतला. ऐश्वर्या बांदिवडेकर हिने 98.5 टक्के गुण मिळविल्याबद्दल मराठी भाषिक वकील संघटनेच्यावतीने विद्यार्थिंनीच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. चव्हाट गल्ली येथील जालगार मारुती मंगल कार्यालय येथे तनिष्काचे […]

मराठी भाषिक वकील संघटनेतर्फे विद्यार्थ्यांचा सत्कार

तनिष्का नावगेकर व ऐश्वर्या बांदिवडेकर यांच्या पालकांचाहि केला सत्कार
► प्रतिनिधी / बेळगाव
एस. एस. एल. सी. परीक्षेत जिल्ह्यामध्ये तनिष्का शंकर नावगेकर हिने 99.58 टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक घेतला. ऐश्वर्या बांदिवडेकर हिने 98.5 टक्के गुण मिळविल्याबद्दल मराठी भाषिक वकील संघटनेच्यावतीने विद्यार्थिंनीच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.
चव्हाट गल्ली येथील जालगार मारुती मंगल कार्यालय येथे तनिष्काचे पालक अॅड. शंकर नावगेकर व संगीता नावगेकर यांचा श्रीफळ, शाल व रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला. अध्यक्ष अॅड. ए. एम. पाटील यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. अॅड. अनिल सांबरेकर यांनी स्वागत केले.
यावेळी अॅड. अमर यळ्ळूरकर, अॅड. सुधीर चव्हाण, अॅड. गजानन पाटील, अॅड. प्रफुल्ल टपालवाले, अॅड. राजेंद्र पवार, अॅड. विजयकुमार होलमनी, अॅड. श्रीकांत पवार, अॅड. सतीश बांदिवडेकर, अॅड. लक्ष्मण पाटील, अॅड. जगदीश हलगेकर यांच्यासह इतर वकील उपस्थित होते. व्ही. एच. बिळगोजी यांनी आभार मानले.