शालेय विद्यार्थी गणवेशापासून दूरच
पंधरवडा उलटूनही कंत्राटदाराकडून पुरवठा नाही
बेळगाव : प्रत्येक वर्षी शालेय शिक्षण विभागाकडून शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेशाचे वितरण केले जाते. परंतु, 2024-25 शैक्षणिक वर्षाला सुरुवात होऊन पंधरवडा उलटला तरी शाळांना गणवेशाचे कापड पोहोचलेले नाही. सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना शर्ट व पँट असा गणवेश देण्यात येतो. पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थिनींना स्कर्ट दिला जातो. तर आठवी ते दहावीच्या विद्यार्थिनींना चुडीदारचे कापड दिले जाते. यावर्षी सहावी व सातवीच्या मुलींनाही चुडीदार गणवेश देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विद्यार्थिनींना गणवेश देण्याचे कंत्राट महाराष्ट्रातील कंत्राटदाराला देण्यात आले आहे.
त्यांच्याकडून दिरंगाई होत असल्याने शाळा सुरू होऊनदेखील गणवेश वितरण करण्यात आलेले नाही. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात एकूण सात विभाग येतात. 1 लाख 96 हजार 292 विद्यार्थ्यांना दोन जोड गणवेश द्यावे लागणार आहेत. यापैकी 58 हजार 851 विद्यार्थ्यांना गणवेशाचे वितरण केले आहे. बेळगाव शहर विभागात गणवेशाचे दोन जोड दिले आहेत तर बेळगाव ग्रामीण विभागात गणवेशाचा एक जोड वितरित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील 20 टक्के विद्यार्थ्यांना गणवेशांचे वितरण केले आहे. उर्वरित गणवेश आठवडाभरात उपलब्ध होतील, अशी माहिती जिल्हा शिक्षणाधिकारी मोहनकुमार हंचाटे यांनी दिली आहे.
Home महत्वाची बातमी शालेय विद्यार्थी गणवेशापासून दूरच
शालेय विद्यार्थी गणवेशापासून दूरच
पंधरवडा उलटूनही कंत्राटदाराकडून पुरवठा नाही बेळगाव : प्रत्येक वर्षी शालेय शिक्षण विभागाकडून शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेशाचे वितरण केले जाते. परंतु, 2024-25 शैक्षणिक वर्षाला सुरुवात होऊन पंधरवडा उलटला तरी शाळांना गणवेशाचे कापड पोहोचलेले नाही. सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना शर्ट व पँट असा गणवेश देण्यात येतो. पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थिनींना स्कर्ट दिला जातो. तर आठवी ते दहावीच्या विद्यार्थिनींना चुडीदारचे कापड दिले जाते. यावर्षी सहावी व सातवीच्या मुलींनाही चुडीदार गणवेश देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विद्यार्थिनींना गणवेश देण्याचे कंत्राट महाराष्ट्रातील कंत्राटदाराला […]
