मऊ, गुलाबी आणि फ्रेश स्ट्राबेरी फ्लेवरचे डोनट्स म्हणजेच स्ट्राबेरी डोनट्स रेसिपी घरच्या घरी खूप सोप्पी बनते.
स्ट्राबेरी डोनट्स रेसिपी
साहित्य-
मैदा – 2 कप
साखर – ⅓ ते ½ कप
बेकिंग पावडर – 1½ टीस्पून
बेकिंग सोडा – ½ टीस्पून
मीठ – एक चिमूटभर
लोणी (मऊ) – ¼ कप
दूध – ½ कप
स्ट्राबेरी प्युरी (ताजे किंवा ब्लेंड केलेले) – ½ कप
अंडी – 1 मोठे
व्हॅनिला एसेन्स – 1 टीस्पून
गुलाबी फूड कलर (ऑप्शनल) – 1-2 थेंब
ग्लेझसाठी:
पावडर शुगर – 1 कप
स्ट्राबेरी प्युरी किंवा जॅम – 2-3 टेबलस्पून
दूध – 1-2 टेबलस्पून (गरज असल्यास)
कृती-
सर्वात आधी कोरडी साहित्य एकत्र गाळून घ्या, मैदा + बेकिंग पावडर + बेकिंग सोडा + मीठ + साखर. आता एका बाऊलमध्ये लोणी, अंडी, दूध, स्ट्राबेरी प्युरी आणि व्हॅनिला चांगले मिसळा. (फूड कलर टाकायचे असल्यास आता टाका). ओले साहित्य कोरड्या साहित्यात टाकून मऊ बॅटर तयार करा. जास्त फेटू नका. आता डोनट पॅन ग्रीस करा आणि बॅटर भरा (¾ भाग). तसेच आता टूथपिक स्वच्छ निघेपर्यंत प्रीहीटेड ओव्हन 180°C वर 12-15 मिनिटे बेक करा. पूर्ण थंड झाल्यावर ग्लेझ लावा. पावडर शुगर + स्ट्राबेरी प्युरी मिसळून स्मूथ ग्लेझ तयार करा. डोनट्सवर ओता किंवा बुडवा. वरून फ्रेश स्ट्राबेरी तुकडे किंवा स्प्रिंकल्स टाकू शकता.
टिप्स
ताज्या स्ट्राबेरीऐवजी फ्रोजेन वापरू शकता (पिळून घ्या).
अधिक स्ट्राबेरी फ्लेवरसाठी ग्लेझमध्ये थोडी स्ट्राबेरी एसेन्स टाका.
एअरफ्रायरमध्ये 160°C वर 8-10 मिनिटे करता येते.
2 दिवस एअरटाइट डब्यात टिकते.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.