अजब आजोबा…

आम्हाला लहानपणी हिंदीत एक धडा होता ‘नानाजी की ऐनक’. त्यातला हुशार नातू शरद चष्मा शोधून द्यायचा. आपणही असं कात्री काम करून शाब्बासकी मिळवावी असं खूप वाटायचं. मोठ्यांच्या सारखं काहीतरी करावं पण आमचे आजोबा त्यांच्यापुढे चार पावलं असायचे. मी चष्मा शोधून दिला की तो परत लगेच सापडावा म्हणून दोरी बांधून घ्यायचे. त्यांना जगातले सगळे विषय यायचे. […]

अजब आजोबा…

आम्हाला लहानपणी हिंदीत एक धडा होता ‘नानाजी की ऐनक’. त्यातला हुशार नातू शरद चष्मा शोधून द्यायचा. आपणही असं कात्री काम करून शाब्बासकी मिळवावी असं खूप वाटायचं. मोठ्यांच्या सारखं काहीतरी करावं पण आमचे आजोबा त्यांच्यापुढे चार पावलं असायचे. मी चष्मा शोधून दिला की तो परत लगेच सापडावा म्हणून दोरी बांधून घ्यायचे. त्यांना जगातले सगळे विषय यायचे. मी हुशार असलो तरी आजोबादेखील प्रचंड हुशार होते. आमच्या शेजारी राहणारे जोशी आजोबा पॅन्टला पट्ट्याऐवजी नाडी बांधायचे. त्यांना विचारलं तर इंग्रजांचा निषेध म्हणून मी हे करतो असं सांगायचे. दिवसभर हाफपँट घालून फिरताना गांधीजींना पाठिंबा द्यायचा म्हणून ही वेळ असं सांगायचे. पुढे मुलाकडे परदेशात गेले तेव्हासुद्धा असेच हिंडायचे. चप्पल तुटली तरी आजोबा चप्पल न शिवता त्याला रुमाल बांधून अनेक दिवस पुढे वापरायचे. स्वावलंबन आणि काटकसर यांचा अतिरेक म्हणजे हे आजोबा. घरातली कोणतीही गोष्ट वाया जाऊ द्यायची नाही असा त्यांचा शिरस्ता.
अगदी डाळ तांदूळ धुतलेले पाणी झाडांनाच घालायचं. कोथिंबिरीच्या काड्या लगेच केरात न टाकता त्या आमटीच्या पाण्यात उकळून घ्यायच्या. म्हणजे त्याचा स्वाद नेमका उतरतो हे सगळं पाहिल्यानंतर आम्हाला अक्षरश: हसायला यायचं. पण आजोबांचे एक वैशिष्ट्या होतं ते कुठली गोष्ट जशी वाया जाऊ देत नसत तशी ते टाकतही नसत. पसारा खूप व्हायचा पण इतरांना अडचणीच्या वेळी त्यांच्या पेट्यांमध्ये त्या सगळ्या गोष्टी तयार असायच्या. एखादा स्क्रू ड्रायव्हर हवा असेल, कात्री हवी असेल सूरी हवी असेल, अगदी कुलपाच्या किल्ल्यादेखील अगणित असायच्याच. जणू काही अलिबाबाचा खजिनाच. असे हे आजोबा थोडे विचित्रच वागत पण स्वभावाला औषध नसते याचा अनुभव यायचा.
सकाळी नेमस्थपणे फिरायला जाणारे आजोबा अनेकांच्या बागेमधली झाडावरची फुलं तोडून आणत.
खरंतर देवघरात देव अगदी मोजकेच पण फुल आणण्याचा त्यांचा अट्टहास मोठा. एखादवेळी एखाद्या बंगल्यातली बाई ओरडायची परंतु आपल्याला काहीच ऐकू आले नाही असा चेहरा करून ते निघून जायचे. त्यांना ऐकायला कमी येत होतं, हे नंतर जसं लोकांना कळलं तसं लोक त्यांना बोलायच्या भानगडीत पडायचे नाहीत. खरंतर आजोबांची सांपत्तीक स्थिती उत्तम, उत्तम पेन्शन, मुलं चांगल्या पदावर नोकरीला परदेशात, पण का कुणास ठाऊक त्यांचा हा स्वभावच बनलेला होता. त्यांना ऐकू येत नाही ही तक्रार मुलांच्या कानावर गेल्यानंतर मुलगा अमेरिकेत आणि मुलगी ऑस्ट्रेलियात, दोघांनीही त्यांना उत्तम दर्जाचे कानाचे महागडे मशीन डॉक्टरांकडे तपासून आणून दिलं होतं. परंतु खूप जपून गोष्टी वापरायच्या म्हणून त्यांनी त्या दोन्ही डब्या लॉकरमध्ये ठेवून दिल्या आणि रोजचा व्यवहार सुरू झाला. एक दिवस परदेशातून मुलगा आल्यानंतर तो आवाकच झाला कारण मशीन न लावता बाबा ऐकू शकत होते. त्यांनी सहजच खोलीत डोकावलं, तर आजोबांनी वॉशिंग मशीनचा पाईप घेऊन त्याला मोठे फनेल  दोन्ही बाजूने लावून एक बाजू टीव्हीच्या साऊंडवर टेकवली होती तर दुसरी कानाला लावली होती. स्वत:चं असं त्यांनी श्रवण यंत्र स्वत:च तयार केलं होतं. आता मात्र मुलांनी कपाळावर हात मारला अन् कानाचे मशीन परत करायला घेऊन गेले अजब गावचे गजब आजोबा.