Miraj News : मिरजमध्ये विचित्र अपघात; खडीवाहू डंपरने होंडा सिटीला दिली जोरदार धडक
मिरजमध्ये मिशन रुग्णालयासमोर खडीवाहू डंपरची होंडा सिटीला धडक
मिरज : मिरज शहरातील मिशन रुग्णालयासमोर मंगळवारी दुपारच्या सुमारास विचित्र अपघाताची घटना घडली. खडी वाहतूक करणाऱ्या लोड डंपरने पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेमुळे होंडा सिटी कार डिव्हायडरलगत काही अंतर फरफटत गेली.
डिव्हायडरलगत एकाच दिशेने जाणाऱ्या एमएच १० डीटी ६३५५ क्रमांकाच्या खडीवाहू डंपरने एमएच ०९ डीए ५७९६ क्रमांकाच्या होंडा सिटी या चारचाकी वाहनाला धडक दिली. धडकेनंतर होंडा सिटी कार डंपरच्या पुढील भागात अडकून डिव्हायडरलगत काही अंतर फरफटत गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र होंडा सिटी वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच मिरज शहर पोलिस व वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गिड्डे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.
अपघातामुळे काही काळ मिशन चौक परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. या अपघाताची नोंद मिरज शहर पोलिस ठाण्यात घेण्यात आली असून, संबंधित डंपर चालकाविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पुढील तपास मिरज शहर पोलिस करीत आहेत.
Home महत्वाची बातमी Miraj News : मिरजमध्ये विचित्र अपघात; खडीवाहू डंपरने होंडा सिटीला दिली जोरदार धडक
Miraj News : मिरजमध्ये विचित्र अपघात; खडीवाहू डंपरने होंडा सिटीला दिली जोरदार धडक
मिरजमध्ये मिशन रुग्णालयासमोर खडीवाहू डंपरची होंडा सिटीला धडक मिरज : मिरज शहरातील मिशन रुग्णालयासमोर मंगळवारी दुपारच्या सुमारास विचित्र अपघाताची घटना घडली. खडी वाहतूक करणाऱ्या लोड डंपरने पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेमुळे होंडा सिटी कार डिव्हायडरलगत काही अंतर फरफटत गेली. डिव्हायडरलगत एकाच दिशेने […]
