वेळीच आवरा, अन्यथा रस्त्यावर उतरू
म. ए. युवा समितीचा इशारा : दुराग्रही संघटनांमुळे शहरातील शांततेला सुरुंग
बेळगाव : काही दुराग्रही संघटना व प्रशासनाकडून मराठी फलकांना लक्ष्य करून कन्नड फलकांसाठी सक्ती केली जात आहे. यामुळे दोन भाषिकांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असून यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे दुराग्रही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना वेळीच आवर घाला, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. म. ए. युवा समितीच्या नेतृत्वाखाली सोमवारी म. ए. समितीच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेऊन शहरात सुरू असणाऱ्या प्रकारांना वाचा फोडली. सध्या बेळगावमध्ये शांततेने सर्व उद्योग-व्यवसाय सुरू असताना अशा संघटनांमुळे शांतताभंग केली जात आहे. दुकाने, आस्थापने, हॉटेल, सहकारी संस्था यावरील मराठी फलक काढून कन्नड फलक लावण्याचा अट्टहास केला जात आहे. दोन दिवसांपूर्वी तर मराठी भागामध्ये जाऊन काहींनी दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. राणी चन्नम्मा चौक येथे महानगरपालिकेच्या परवानगीने लावण्यात आलेले व्यावसायिक फलक पोलीस प्रशासनाच्या समक्ष फाडण्यात आले.
पिरनवाडी क्रॉस, ब्रह्मनगर येथे एका नव्या हॉटेलच्या नावावरून गोंधळ घालून नामफलक झाकून ठेवण्यात आला. बसवर लावण्यात आलेले इंग्रजी व मराठी फलकही फाडून धुडगूस घालण्याचा प्रयत्न झाला. या सर्व प्रकारांमुळे बेळगावच्या व्यावसायिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. भारतीय संविधानातील कलम 19-अ प्रमाणे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पायमल्ली केली जात आहे. अशाच एका भाषिक सक्ती प्रकरणामध्ये 2014 साली बेंगळूर उच्च न्यायालयाने व्होडाफोन कंपनीबाबत दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना कलम 19-अ व कलम-29 नुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन होत असून अशाप्रकारे कोणावरही विशिष्ट भाषेची सक्ती करता येणार नाही, असा निकाल दिला होता, हे पोलीस आयुक्तांना पटवून देण्यात आले. पोलीस आयुक्तांनी युवा समिती, तसेच समिती पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत आपण याबाबत योग्य ती कारवाई करू, असे आश्वासन दिले. मराठी भाषिकांची गळचेपी करण्याचे प्रकार यापुढेही सुरू राहिल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा म. ए. समितीने दिला. यावेळी अध्यक्ष अंकुश केसरकर, कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, समिती नेते रणजित चव्हाण-पाटील, रमाकांत कोंडुसकर, किरण गावडे, मदन बामणे, आर. एम. चौगुले, नगरसेवक रवी साळुंखे, शिवाजी मंडोळकर, वासू सामजी, सिद्धार्थ चौगुले, मनोहर हुंदरे, श्रीकांत कदम, माजी नगरसेवक राजू बिर्जे, मनोहर हलगेकर, राकेश पलंगे व इतर उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी वेळीच आवरा, अन्यथा रस्त्यावर उतरू
वेळीच आवरा, अन्यथा रस्त्यावर उतरू
म. ए. युवा समितीचा इशारा : दुराग्रही संघटनांमुळे शहरातील शांततेला सुरुंग बेळगाव : काही दुराग्रही संघटना व प्रशासनाकडून मराठी फलकांना लक्ष्य करून कन्नड फलकांसाठी सक्ती केली जात आहे. यामुळे दोन भाषिकांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असून यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे दुराग्रही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना वेळीच आवर घाला, अशी मागणी महाराष्ट्र […]