गोवेकरांना नागरिकत्व देणे बंद करावे
पोर्तुगाल दुतावासाचा पोर्तुगाल सरकारला प्रस्ताव : आता सर्वांचे लक्ष पोर्तुगाल सरकारच्या निर्णयाकडे
पणजी : गोवा मुक्तीपुर्वी म्हणजे 1961 सालच्या अगोदर जन्मलेल्या गोमंतकीयांना आणि त्यांच्या वंशजांना पोर्तुगीज नागरिकत्व देण्याचे धोरण बंद करावे, असा प्रस्ताव भारतातील पोर्तुगीज दुतावासाने पोर्तुगाल सरकारला पाठवला आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास पोर्तुगीज नागरिकत्त्व किंवा पासपोर्ट मिळणे कठीण होणार असल्याचे समोर आले आहे. या प्रस्तावामुळे आता दुहेरी नागरिकत्वाच्या विषयाला वेगळे वळण प्राप्त झाले आहे. सध्या दुहेरी नागरिकत्वाचा विषय गोव्यात गाजत असून काहींवेळा वादग्रस्तही ठरत आहे. त्या पार्श्वभूमीवर हा प्रस्ताव पाठवल्यामुळे पोर्तुगीज नागरिकत्त्व किंवा पासपोर्ट मिळणे बंद होण्याचे संकेत दिसत आहेत.
पोर्तुगाल वेबसाईटवर प्रस्ताव
दुहेरी नागरिकत्त्व किंवा पोर्तुगीज पासपोर्ट प्रकरणी तोडगा काढण्याच्या तसेच वाद सोडवण्याच्या उद्देशाने ही पावले टाकण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. पोर्तुगीज नागरिकत्व किंवा पासपोर्ट मिळवण्याचे नियम, निकष अधिक कडक होण्याचे संकेत त्यातून मिळत आहेत. त्यासाठी जे इच्छुक आहेत ते निराश होण्याची शक्यता असून हा प्रस्ताव वाचून कदाचित नागरिकत्त्व किंवा पासपोर्ट लवकरात लवकर मिळावे म्हणून गर्दी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोर्तुगालच्या वेबसाईटवरून सदर प्रस्तावाची माहिती देण्यात आली आहे. उपरोक्त प्रस्तावानुसार पोर्तुगीज नागरिकत्त्व किंवा पासपोर्ट मिळण्याची योजना किती कालावधीसाठी चालू ठेवावी याबाबत निर्णय पोर्तुगाल सरकारला घ्यावा लागेल, अशी चिन्हे दिसत आहेत.
दुहेरी नागरिकत्वाबाबत वाद
भारत सोडून इतर देशातील लोकांना पोर्तुगीज नागरिकत्व, पासपोर्ट देण्यासाठी पोर्तुगाल सरकारने कोणतीही मुदत निश्चित पेलेली नाही. पोर्तुगीज नागरिकत्व स्विकारले तर भारतीय नागरिकत्त्व सोडावे लागते तसेच दुहेरी नागरिकत्त्व असल्यास भारतीय पासपोर्टही रद्द करावा लागतो किंवा तसे करताना अनेक अडचणी येतात. म्हणून हा प्रस्ताव पाठवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगिते.
विषयाला वेगळे वळण
पोर्तुगीज नागरिकत्व आणि पोर्तुगीज पासपोर्ट हे दोन्ही विषय एकमेकांशी संलग्नीत असून हा विषय गेल्या अनेक वर्षांपासून वादग्रस्त आहे. याविषयावरुन अनेक तर्कवितर्क अधूनमधून लढविले जातात. भारतीय नागरिकत्व असताना पोर्तुगीज नागरिकत्व कसे स्वीकारले जाते? असा प्रश्न करुन अशा लोकांच्या राष्ट्रीयतेविषयीही संशय व्यक्त केला जातो. अनेकजण पोटापाण्याच्या कारणांमुळे पोर्तुगालमध्ये जातात तर काहीजण शिक्षणासाठी जातात आणि ते तेथील नागरिकत्व स्वीकारतात. 1961 साली गोव्यात जन्मलेल्यांना आणि त्यांच्या पुढील वारसांना पोर्तुगीज नागरिकत्व दिले जात आहे. मात्र आता ते देणे बंद करावे, असा प्रस्ताव खुद्द पोर्तुगीज दुतावासाने पोर्तुगाल सरकारला पाठवल्याने दुहेरी नागरिकत्वाच्या या विषयला वेगळे वळण प्राप्त झाले आहे.
Home महत्वाची बातमी गोवेकरांना नागरिकत्व देणे बंद करावे
गोवेकरांना नागरिकत्व देणे बंद करावे
पोर्तुगाल दुतावासाचा पोर्तुगाल सरकारला प्रस्ताव : आता सर्वांचे लक्ष पोर्तुगाल सरकारच्या निर्णयाकडे पणजी : गोवा मुक्तीपुर्वी म्हणजे 1961 सालच्या अगोदर जन्मलेल्या गोमंतकीयांना आणि त्यांच्या वंशजांना पोर्तुगीज नागरिकत्व देण्याचे धोरण बंद करावे, असा प्रस्ताव भारतातील पोर्तुगीज दुतावासाने पोर्तुगाल सरकारला पाठवला आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास पोर्तुगीज नागरिकत्त्व किंवा पासपोर्ट मिळणे कठीण होणार असल्याचे समोर आले आहे. […]