वडगाव मंगाईयात्रेत प्राणीबळी रोखा
दयानंद स्वामींचे पोलीस आयुक्तांना निवेदन : भाविकांनी सात्विक पद्धतीने देवीची पूजा करावी
प्रतिनिधी/ बेळगाव
वडगाव येथील श्री मंगाईदेवी यात्रेत प्राणीबळी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक पावले उचलावीत, अशी मागणी विश्वप्राणी कल्याण मंडळ व प्राणीबळी निर्मूलन महासंघाचे श्री दयानंद स्वामीजींनी प्रशासनाकडे केली आहे.
यासंबंधी पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांना स्वामीजींनी एक निवेदन दिले आहे. 29, 30 व 31 जुलै रोजी देवीची यात्रा भरणार आहे. या काळात देवस्थानच्या आवारात किंवा परिसरात कोणत्याही प्रकारची प्राणीहत्या करू नये, देवस्थानावर दुरून प्राणी फेकू नयेत, अशी मागणीही स्वामीजींनी केली आहे.
देवदेवतांच्या नावे प्राणीहत्या करणे अंधश्रद्धेचाच प्रकार आहे. हा प्रकार पर्यावरणालाही घातक आहे व धर्मविरोधी आहे. त्यामुळे भाविकांनी अहिंसात्मक मार्गाने सात्विक पद्धतीने देवीची पूजा करावी, अशी विनंती करतानाच देवालये वधालये होऊ नयेत तर ती दिव्यालये ठरावीत. प्राणीहत्या व अमली पदार्थांपासून मुक्त व्हावे. भक्ती, सूज्ञान व सदाचाराचा त्रिवेणी संगम ठरावेत, असे आवाहनही स्वामीजींनी केले असून पोलीस आयुक्तांकडे उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या प्रति सोपविल्या आहेत.
Home महत्वाची बातमी वडगाव मंगाईयात्रेत प्राणीबळी रोखा
वडगाव मंगाईयात्रेत प्राणीबळी रोखा
दयानंद स्वामींचे पोलीस आयुक्तांना निवेदन : भाविकांनी सात्विक पद्धतीने देवीची पूजा करावी प्रतिनिधी/ बेळगाव वडगाव येथील श्री मंगाईदेवी यात्रेत प्राणीबळी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक पावले उचलावीत, अशी मागणी विश्वप्राणी कल्याण मंडळ व प्राणीबळी निर्मूलन महासंघाचे श्री दयानंद स्वामीजींनी प्रशासनाकडे केली आहे. यासंबंधी पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांना स्वामीजींनी एक निवेदन दिले आहे. 29, 30 […]