गुंतवणूक करून फसलेल्या नागरिकांचे निवेदन

जिल्हाधिकारी नितेश पाटील यांचे तपशीलासह अर्ज दाखल करण्याचे आवाहन बेळगाव : विविध कंपन्यांमध्ये पैसे गुंतवणूक करून फसलेल्या नागरिकांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना फसवणूक झालेल्या नागरिकांकडून तपशीलासह अर्ज स्वीकारण्याची सूचना करण्यात आली आहे. सदर अर्ज त्वरित स्वीकारण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन ठगी पिडीत जमाकर्ता परिवार संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. पैसे […]

गुंतवणूक करून फसलेल्या नागरिकांचे निवेदन

जिल्हाधिकारी नितेश पाटील यांचे तपशीलासह अर्ज दाखल करण्याचे आवाहन
बेळगाव : विविध कंपन्यांमध्ये पैसे गुंतवणूक करून फसलेल्या नागरिकांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना फसवणूक झालेल्या नागरिकांकडून तपशीलासह अर्ज स्वीकारण्याची सूचना करण्यात आली आहे. सदर अर्ज त्वरित स्वीकारण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन ठगी पिडीत जमाकर्ता परिवार संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. पैसे दामदुप्पट करण्याचे आमिष दाखवून अनेक गुंतवणूक कंपन्यांकडून नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यात आली आहे. पैसे भरलेल्या नागरिकांना पैसे मिळविण्यासाठी गुंतवणूक कंपन्यांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. जवळपास 10 वर्षांपासून हजारो नागरिकांचे कोट्यावधी रुपये अडकून पडले आहेत. याची दखल घेऊन बडस् अॅक्ट 2019 अंतर्गत सदर रक्कम परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत. यासाठी गुंतवणूक केलेल्यांकडून संपूर्ण तपशीलासह अर्ज दाखल करण्याची सूचना केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये गुंतवणूक केलेल्या कंपनीचा तपशील व एजंटांचे नाव नमूद करण्याची सूचना करण्यात आली आहे. सदर तपशील नसलेला अर्ज स्वीकारण्यात येत नसल्याने अर्जदारांची अडचण झाली आहे. यासाठी सादर करण्यात येणारे अर्ज स्वीकारण्यात यावे व गुंतवणूक केलेल्या नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी गुंतवणूकदारांशी संवाद साधला. सदर अर्ज करण्यासाठी एजंट नागरिकांकडून पैसे घेत आहेत. आधीच फसलेल्या नागरिकांना आर्थिक संकटात लोटले जात आहे. हे थांबविण्यासाठीच नव्या स्वरुपातील अर्ज देण्यात आला आहे. यामध्ये कोणताच संशय नसून नागरिकांनी मोफत अर्ज घेऊन तपशीलासह अर्ज सादर करावे, असे आवाहन केले. यावेळी संघटनेचे कार्यकर्ते व गुंतवणूकदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.