सिने क्षेत्रात विशेष योगदानासाठी अभिनेत्री काजोल, मुक्ताबर्वे, महेश मांजरेकर आणि अनुपम खेर यांना राज्यशासनाचे पुरस्कार जाहीर

सिने क्षेत्रात चांगली कामगिरी आणि विशेष योगदान देणाऱ्यांना दर वर्षी राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून पुरस्कार देण्यात येते. यंदाच्या वर्षी मानाचे चित्रपट पुरस्कारांची यादी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी जाहीर केली आहे.

सिने क्षेत्रात विशेष योगदानासाठी अभिनेत्री काजोल, मुक्ताबर्वे, महेश मांजरेकर आणि अनुपम खेर यांना राज्यशासनाचे पुरस्कार जाहीर

सिने क्षेत्रात चांगली कामगिरी आणि विशेष योगदान देणाऱ्यांना दर वर्षी राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून पुरस्कार देण्यात येते. यंदाच्या वर्षी मानाचे चित्रपट पुरस्कारांची यादी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी जाहीर केली आहे. 

ALSO READ: हिंदीची सक्ती करू नये,राज्यात मराठीची सक्ती करावी म्हणत संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
या यादीत व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार, व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार, राज कपूर जीवन गौरव पुरस्कार, राज कपूर विशेष योगदान पुरस्कार,गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, देण्यात येतील. अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. 

या यादीमध्ये व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते, दिगदर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांना जाहीर झाला असून त्यांना पुरस्कारात रोख रक्कम 10 लाख रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि चांदीचे पदक देण्यात येणार आहे. 

ALSO READ: एआय वापरून बाळासाहेबांचे भाषण तयार केले,चंद्रशेखर बावनकुळे यांची विरोधकांवर सडकून टीका
व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कारासाठी अभिनेत्री मुक्ता बर्वे  यांची निवड झाली असून त्यांना 6 लाख रोख रकम, स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि चांदीचे पदक देण्यात येणार आहे. 

राजकपूर जीवनगौरव पुरस्कारासाठी सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना जाहीर करण्यात आला असून त्यांना रोख रक्कम 10 लाख रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि चांदीचे पदक दिले जाणार आहे. 

राजकपूर विशेष योगदान पुरस्कार यंदा अभिनेत्री काजोल यांना जाहीर झाले आहे. त्यांना रोख रक्कम 6 लाख रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह, चांदीचे पदक देण्यात येणार आहे.  

 

1993 पासून गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार – गझल गायक भीमराव पांचाळे यांना जाहीर करण्यात आला आहे.पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम 10 लाख, मानचिन्ह, मानपत्र आणि शाल श्रीफळ असे असणार आहे. 

ALSO READ: आम्ही हिंदू आहोत, पण हिंदी नाही!” मनसेने बॅनर लावले,हिंदीच्या सक्तीवरून राज ठाकरे आक्रमक

 हा पुरस्कार वितरण सोहळा येत्या 25 एप्रिल रोजी मुंबईच्या एन.एस. सी. आय. डोम. वरळी येथे होणार आहे. 

 

ह्या पुरस्कार सोहळा कार्यक्रमात गायक सुरेश वाडकर, वैशाली सामंत, आदर्श शिंदे, उर्मिला धनगर, नंदेश उमप आदी कलाकार सहभागी होणार आहेत, अशी माहिती मंत्री आशिष शेलार यांनी दिली.

Edited By – Priya Dixit

Go to Source