हिंडलगा मध्यवर्ती कारागृहाला राज्य पोलीस महासंचालकांची भेट

सुरक्षाव्यवस्थेची जाणून घेतली माहिती बेळगाव : कारागृह विभागाचे अतिरिक्त राज्य पोलीस महासंचालक बी. दयानंद यांनी रविवारी हिंडलगा मध्यवर्ती कारागृहाला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. शनिवारी रात्रीच ते बेळगावात दाखल झाले होते. बेळगाव उत्तर विभागाचे कारागृह विभागाचे उपमहानिरीक्षक टी. पी. शेष, हिंडलगा मध्यवर्ती कारागृहाचे प्रभारी मुख्य अधीक्षक व्ही. कृष्णमूर्ती यांनी पुष्पगुच्छ देऊन दयानंद यांचे स्वागत केले. त्यानंतर कारागृहातील […]

हिंडलगा मध्यवर्ती कारागृहाला राज्य पोलीस महासंचालकांची भेट

सुरक्षाव्यवस्थेची जाणून घेतली माहिती
बेळगाव : कारागृह विभागाचे अतिरिक्त राज्य पोलीस महासंचालक बी. दयानंद यांनी रविवारी हिंडलगा मध्यवर्ती कारागृहाला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. शनिवारी रात्रीच ते बेळगावात दाखल झाले होते. बेळगाव उत्तर विभागाचे कारागृह विभागाचे उपमहानिरीक्षक टी. पी. शेष, हिंडलगा मध्यवर्ती कारागृहाचे प्रभारी मुख्य अधीक्षक व्ही. कृष्णमूर्ती यांनी पुष्पगुच्छ देऊन दयानंद यांचे स्वागत केले. त्यानंतर कारागृहातील प्रत्येक विभागांना भेटी देऊन त्यांनी पायाभूत सुविधांची पाहणी केली. कारागृहात आणखी कोणत्या सुधारणा केल्या पाहिजेत, याविषयी दयानंद यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. हिंडलगा मध्यवर्ती कारागृह राज्यातील महत्त्वाच्या कारागृहांपैकी एक आहे. येथील सुरक्षाव्यवस्था आणखी कडक करण्यासाठी दयानंद यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. बेळगावच्या जिल्हा पोलीसप्रमुख पदावर असतानाही त्यांनी अनेक वेळा कारागृहांना भेटी देऊन तेथील गैरप्रकार उघडकीस आणले होते.