राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदांच्या प्रकृतीची विचारपूस केली
अभिनेता व शिवसेने नेते गोविंदा यांचा आज सकाळी अपघात झाला.त्यांच्या परवाना असलेल्या रिव्हॉल्व्हर ने त्यांच्यात पायाला गोळी लागली आणि ते जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आता त्यांची प्रकृती बरी आहे. त्यांनी आपल्या चाहत्यांना निवेदन करून तब्बेतीची माहिती दिली आणि चाहत्यांचे आभार मानले आहे.
दरम्यान त्यांच्या तब्बेतीची विचारपूस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदाला फोन वरून केली.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनेता गोविंदांशी फोनवरून चर्चा करत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांना त्यांची विशेष काळजी घेण्याचे निर्देश दिले. गोविंदाला रुग्णालयात भेटायला कश्मिरा शाह, विनय आनंद, दीपक सावंत भेटायला आले.
Edited by – Priya Dixit