मोकाट जनावरे पकडणे मोहीम सुरू

गुरुवारी विविध ठिकाणी पकडलेली जनावरे गोशाळेत पाठविली बेळगाव : शहरामध्ये मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वारंवार करण्यात आली. त्यानुसार महानगरपालिकेच्यावतीने मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम गुरुवारी राबविण्यात आली. विविध ठिकाणी मोकाट फिरणाऱ्या जनावरांना ताब्यात घेऊन मनपाच्या गो-शाळेत दाखल करण्यात आले आहे. शहरामध्ये मोकाट जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शहराच्या मध्यवर्ती […]

मोकाट जनावरे पकडणे मोहीम सुरू

गुरुवारी विविध ठिकाणी पकडलेली जनावरे गोशाळेत पाठविली
बेळगाव : शहरामध्ये मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वारंवार करण्यात आली. त्यानुसार महानगरपालिकेच्यावतीने मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम गुरुवारी राबविण्यात आली. विविध ठिकाणी मोकाट फिरणाऱ्या जनावरांना ताब्यात घेऊन मनपाच्या गो-शाळेत दाखल करण्यात आले आहे. शहरामध्ये मोकाट जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी तसेच मुख्य रस्त्यांवर ही जनावरे ठाण मांडून बसत आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. याचबरोबर अचानक भाजी विक्रेत्यांची भाजी विस्कटणे असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे तातडीने त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात येत होती.
जनावरे मालकांनीही गांभीर्याने घ्यावे
गुरुवारी शहरातील विविध ठिकाणी मोकाट फिरणाऱ्या जनावरांना महापालिकेच्या  कर्मचाऱ्यांना पकडून त्यांना गोशाळेमध्ये दाखल केले आहे. यापुढेही ही मोहीम राबविण्यात येणार आहे. अनेक जनावरांचे मालक रस्त्यावर जनावरे सोडून जात आहेत. त्यामुळे त्याचा त्रास सर्वसामान्यांना होत आहे. तेव्हा जनावरे मालकांनीही याची गांभीर्याने दखल घ्यावी, असे आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.