आषाढीसाठी हुबळी-पंढरपूर रेल्वे सुरू करा

वारकऱ्यांचे खासदारांना निवेदन वार्ताहर /नंदगड आषाढीसाठी पंढरपूरला जाणारे अनेक वारकरी आहेत. रेल्वेचा प्रवास वारकऱ्यांसाठी सुखकर प्रवास आहे. त्यासाठी हुबळीहून खानापूर, बेळगावमार्गे पंढरपूरला जाण्या येण्यासाठी दि. 25 ते दि. 30 जूनपर्यंत विशेष रेल्वेची सोय करावी, अशी मागणी करणारे निवेदन खानापूर परिसरातील वारकऱ्यांनी कारवारचे नूतन आमदार विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांच्याकडे सुपूर्द केली आहे. निवेदनाची प्रत रेल्वे मंत्र्यांनाही पाठविली आहे. निवेदन […]

आषाढीसाठी हुबळी-पंढरपूर रेल्वे सुरू करा

वारकऱ्यांचे खासदारांना निवेदन
वार्ताहर /नंदगड
आषाढीसाठी पंढरपूरला जाणारे अनेक वारकरी आहेत. रेल्वेचा प्रवास वारकऱ्यांसाठी सुखकर प्रवास आहे. त्यासाठी हुबळीहून खानापूर, बेळगावमार्गे पंढरपूरला जाण्या येण्यासाठी दि. 25 ते दि. 30 जूनपर्यंत विशेष रेल्वेची सोय करावी, अशी मागणी करणारे निवेदन खानापूर परिसरातील वारकऱ्यांनी कारवारचे नूतन आमदार विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांच्याकडे सुपूर्द केली आहे. निवेदनाची प्रत रेल्वे मंत्र्यांनाही पाठविली आहे. निवेदन देताना रमेश नार्वेकर, शांताराम हेब्बाळकर आदींसह तालुक्यातील वारकरी उपस्थित होते.