सेंट झेवियर्स, बी. एन. खोत स्कूल विजयी

बेळगाव : बेळगाव स्पोर्ट्स क्लब आयोजित 25 व्या हनुमान चषक 17 वर्षाखालील मुलांच्या आंतरशालेय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी खेळवण्यात आलेल्या विविध सामन्यात सेंट झेवियर्स, बी. एन. खोत स्कूल बागलकोट संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघावर मात करत विजय संपादन केला. प्लॅटिनम जुब्ली मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत आजच्या पहिल्या सामन्यात सेंट झेवियर्सने बी. एन. खोत स्कूल बागलकोट […]

सेंट झेवियर्स, बी. एन. खोत स्कूल विजयी

बेळगाव : बेळगाव स्पोर्ट्स क्लब आयोजित 25 व्या हनुमान चषक 17 वर्षाखालील मुलांच्या आंतरशालेय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी खेळवण्यात आलेल्या विविध सामन्यात सेंट झेवियर्स, बी. एन. खोत स्कूल बागलकोट संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघावर मात करत विजय संपादन केला. प्लॅटिनम जुब्ली मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत आजच्या पहिल्या सामन्यात सेंट झेवियर्सने बी. एन. खोत स्कूल बागलकोट संघाचा 27 धावांनी पराभव केला. तर दुसऱ्या सामन्यात बी एन खोत बागलकोट संघाने केएलएस स्कूल संघाचा 12 धावांनी पराभव केला. यावेळी विजेत्या संघातील चेतन प्रजापत व राहुल पाटील यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
संक्षिप्त धावफलक
सेंट झेवियर्स स्कूल-20 षटकात, 4 बाद, 123 धावा. (आरुष काळभैरव 42, चेतन प्रजापत 26, चंदन कुंदरनाड 17 धावा, बागलकोटचा अक्षय के. 2, राहुल व समर्थ प्रत्येकी 1 बळी) बी. एन. खोत स्कूल बागलकोट-15.4 षटकात, सर्व बाद 96 धावा.राहुल पाटील 24 गौरव 18 सेंट झेवियर्स स्कूल संघातर्फे चेतन प्रजापत व संप्रीत प्रत्येकी 3 तर इंदर प्रजापत 2 बळी) बी. एन. खोत बागलकोट-20 षटकात सर्व बाद 142 धावा. (चंदन 31, शिवम 21 ,गौरव 20 धावा, केएलएस संघातर्फे समर्थ 4, वेदांत व आर्यन प्रत्येकी 2 बळी.) के एल एस स्कूल 19 षटकात, सर्व बाद 130 धावा. (वेदांत दूदानी 28, वर्धमान पाटील 20 धावा. बागलकोट संघातर्फे राहुल पाटील 3, समर्थ पतंग 2 बळी)