दिवाळीनिमित्त एसटीचा पर्यटन पास झाला स्वस्त

दिवाळी (diwali 2025) आणि सुट्टीचा हंगाम काही दिवसांवर आहे. हे लक्षात घेता, एसटी महामंडळाने पर्यटनासाठी मोठी संधी उपलब्ध केली आहे. तीर्थस्थळे, पर्यटनस्थळे आणि अन्य प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्याची नागरिकांची आवड लक्षात घेता ‘आवडेल तेथे प्रवास’ योजनेच्या भाडेदरात किमान 225 ते कमाल एक हजार 254 रुपयांपर्यंत मोठी कपात केली आहे. महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, राज्य (maharashtra) परिवहन प्राधिकरणाने एसटी महामंडळाला (msrtc) 30 टक्क्यांपर्यंत भाडेवाढ करण्याची मुभा दिली आहे. जानेवारी 2025 पासून जवळपास 15 टक्के भाडे वाढ लागू झाले होते. तसेच आगामी दिवाळी सुट्ट्यांच्या (holidays) कालावधीसाठी 10 टक्के हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला होता. राज्यातील पूरस्थिती लक्षात घेता महामंडळाने हंगामी दरवाढ रद्द केली. यामुळे ‘आवडेल तेथे प्रवास’ योजनेअंतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांनादेखील याचा लाभ मिळणार आहे. प्रौढ आणि मुलांसाठी चार दिवस आणि सात दिवस अशा स्वरूपात पास आहेत. महामंडळातील साधी, जलद, रातराणी, शिवशाही, ई-शिवाई, शिवनेरी अशा सर्व बसगाड्यांमध्ये योजनेतील पास ग्राह्य आहे. या पासवर अमर्यादित प्रवासाची मुभा प्रवाशांना आहे. साधी बस सेवा (साधी, जलद, रात्रसेवा आंतरराज्यसह)                          जुने दर     नवे दरचार दिवस (प्रौढ)   1814       1364चार दिवस (मुले)    910          685सात दिवस (प्रौढ)  3171       2,382सात दिवस (मुले)  1588       1194 शिवशाही आसनी बस सेवा (आंतरराज्यसह)                        जुने दर       नवे दरचार दिवस (प्रौढ)   2533        1818चार दिवस (मुले)   1261        911सात दिवस (प्रौढ)  4429       3175सात दिवस (मुले)  2217      1590 12 मीटर ई-बस (ई शिवाई)                        जुने दर      नवे दरचार दिवस (प्रौढ)   2861       2072चार दिवस (मुले)   1438      1038सात दिवस (प्रौढ)  5003      3619सात दिवस (मुले)  2504     1812हेही वाचा महाराष्ट्रातील 75000 तरुणांना कौशल्य प्रशिक्षण ॲप आधारित टॅक्सीसेवा गुरुवारी बंद राहणार

दिवाळीनिमित्त एसटीचा पर्यटन पास झाला स्वस्त

दिवाळी (diwali 2025) आणि सुट्टीचा हंगाम काही दिवसांवर आहे. हे लक्षात घेता, एसटी महामंडळाने पर्यटनासाठी मोठी संधी उपलब्ध केली आहे. तीर्थस्थळे, पर्यटनस्थळे आणि अन्य प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्याची नागरिकांची आवड लक्षात घेता ‘आवडेल तेथे प्रवास’ योजनेच्या भाडेदरात किमान 225 ते कमाल एक हजार 254 रुपयांपर्यंत मोठी कपात केली आहे.महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, राज्य (maharashtra) परिवहन प्राधिकरणाने एसटी महामंडळाला (msrtc) 30 टक्क्यांपर्यंत भाडेवाढ करण्याची मुभा दिली आहे. जानेवारी 2025 पासून जवळपास 15 टक्के भाडे वाढ लागू झाले होते. तसेच आगामी दिवाळी सुट्ट्यांच्या (holidays) कालावधीसाठी 10 टक्के हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला होता. राज्यातील पूरस्थिती लक्षात घेता महामंडळाने हंगामी दरवाढ रद्द केली. यामुळे ‘आवडेल तेथे प्रवास’ योजनेअंतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांनादेखील याचा लाभ मिळणार आहे.प्रौढ आणि मुलांसाठी चार दिवस आणि सात दिवस अशा स्वरूपात पास आहेत. महामंडळातील साधी, जलद, रातराणी, शिवशाही, ई-शिवाई, शिवनेरी अशा सर्व बसगाड्यांमध्ये योजनेतील पास ग्राह्य आहे. या पासवर अमर्यादित प्रवासाची मुभा प्रवाशांना आहे.साधी बस सेवा (साधी, जलद, रात्रसेवा आंतरराज्यसह)                          जुने दर     नवे दरचार दिवस (प्रौढ)   1814       1364चार दिवस (मुले)    910          685सात दिवस (प्रौढ)  3171       2,382सात दिवस (मुले)  1588       1194शिवशाही आसनी बस सेवा (आंतरराज्यसह)                        जुने दर       नवे दरचार दिवस (प्रौढ)   2533        1818चार दिवस (मुले)   1261        911सात दिवस (प्रौढ)  4429       3175सात दिवस (मुले)  2217      159012 मीटर ई-बस (ई शिवाई)                        जुने दर      नवे दरचार दिवस (प्रौढ)   2861       2072चार दिवस (मुले)   1438      1038सात दिवस (प्रौढ)  5003      3619सात दिवस (मुले)  2504     1812हेही वाचामहाराष्ट्रातील 75000 तरुणांना कौशल्य प्रशिक्षणॲप आधारित टॅक्सीसेवा गुरुवारी बंद राहणार

Go to Source