एसटीच्या तिकीटदरात 14.95 टक्के वाढ
मुंबईसह (mumbai) राज्यातील (maharashtra) रस्तेप्रवासासाठी प्रवाशांना आता अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. विधानसभा निवडणुकांपूर्वीपासूनच चर्चेत असलेली राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या तिकीट दरवाढीस (fare hike) गुरुवारी मंजुरी मिळाली. यानुसार एसटीच्या तिकीटदरात 14.95 टक्के वाढ होणार आहे. त्याचसोबत मुंबई महानगर क्षेत्रात रिक्षा-टॅक्सीच्या किमान भाडेदरातील तीन रुपयांची प्रस्तावित वाढ लवकरच लागू होईल.परिवहन विभागाच्या अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत एसटीच्या तिकीटवाढीला मंजुरी देण्यात आली आहे. मात्र सुधारित तिकीटदर केव्हा लागू होतील, याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.राज्यात सत्तास्थापनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी राज्यातील सर्व विभागांना 100 दिवसांचे नियोजन करून त्याचे सादरीकरण करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार एसटी महामंडळाने केलेल्या नियोजनात स्वमालकीच्या पाच हजार नव्या बस विकत घेणे, पहिल्या चार महिन्यांत 20 चार्जिंग स्टेशन कार्यान्वित करणे, 125 बसचे पारंपरिक इंधनावरून सीएनजी इंधनात रूपांतर आणि एसटी तिकीटदरात 14.95 टक्के भाडेवाढ अशा प्रमुख मुद्द्यांचा समावेश होता.विधानसभा निवडणुकांपूर्वी सादर केलेल्या प्रस्तावात एसटीच्या तिकीटदरात सरसकट 18 टक्के वाढ प्रस्तावित होती. मात्र त्यात सुधारणा करत 14.95 टक्के तिकीट दरवाढीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. निवडणुकांच्या काळात हा प्रस्ताव थांबवण्यात आला होता. मात्र आता एसटी महामंडळाच्या (msrtc) संचालक मंडळाने यास मंजुरी दिली. सन 2021 पासून दरवाढ प्रलंबित आहे, असा युक्तिवादही महामंडळाने केला.’शहर, तसेच उपनगरात रिक्षा-टॅक्सीचालकांकडून कमी अंतराचे भाडे नाकारण्याच्या घटना वारंवार घडत आहे. रिक्षा-टॅक्सीचालकांच्या अरेरावीमुळे रेल्वे आणि मेट्रो स्थानक परिसरात सातत्याने वाहतूककोंडी होते. यामुळे आधी रिक्षा-टॅक्सीचालकांनी प्रवासी सेवा सुधारण्याची गरज असून त्यानंतर राज्य सरकारने भाडेवाढ देणे योग्य ठरेल,’ अशी प्रतिक्रिया सामान्य प्रवाशांनी व्यक्त केली.सुधारित भाडेवाढीनुसार रिक्षा-टॅक्सी मीटरच्या प्रमाणीकरणाची तारीख निश्चित करणे आणि अन्य तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर भाडेवाढ लागू होण्याची तारीख घोषित होणार आहे.हेही वाचा‘कोल्ड प्ले’साठी मुंबई-अहमदाबाद दरम्यान विशेष रेल्वेगाड्याकोपरीत 5 फेब्रुवारीपर्यंत चिकन, मटन विक्री दुकाने राहणार बंद
Home महत्वाची बातमी एसटीच्या तिकीटदरात 14.95 टक्के वाढ
एसटीच्या तिकीटदरात 14.95 टक्के वाढ
मुंबईसह (mumbai) राज्यातील (maharashtra) रस्तेप्रवासासाठी प्रवाशांना आता अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. विधानसभा निवडणुकांपूर्वीपासूनच चर्चेत असलेली राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या तिकीट दरवाढीस (fare hike) गुरुवारी मंजुरी मिळाली.
यानुसार एसटीच्या तिकीटदरात 14.95 टक्के वाढ होणार आहे. त्याचसोबत मुंबई महानगर क्षेत्रात रिक्षा-टॅक्सीच्या किमान भाडेदरातील तीन रुपयांची प्रस्तावित वाढ लवकरच लागू होईल.
परिवहन विभागाच्या अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत एसटीच्या तिकीटवाढीला मंजुरी देण्यात आली आहे. मात्र सुधारित तिकीटदर केव्हा लागू होतील, याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
राज्यात सत्तास्थापनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी राज्यातील सर्व विभागांना 100 दिवसांचे नियोजन करून त्याचे सादरीकरण करण्याच्या सूचना केल्या होत्या.
त्यानुसार एसटी महामंडळाने केलेल्या नियोजनात स्वमालकीच्या पाच हजार नव्या बस विकत घेणे, पहिल्या चार महिन्यांत 20 चार्जिंग स्टेशन कार्यान्वित करणे, 125 बसचे पारंपरिक इंधनावरून सीएनजी इंधनात रूपांतर आणि एसटी तिकीटदरात 14.95 टक्के भाडेवाढ अशा प्रमुख मुद्द्यांचा समावेश होता.
विधानसभा निवडणुकांपूर्वी सादर केलेल्या प्रस्तावात एसटीच्या तिकीटदरात सरसकट 18 टक्के वाढ प्रस्तावित होती. मात्र त्यात सुधारणा करत 14.95 टक्के तिकीट दरवाढीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
निवडणुकांच्या काळात हा प्रस्ताव थांबवण्यात आला होता. मात्र आता एसटी महामंडळाच्या (msrtc) संचालक मंडळाने यास मंजुरी दिली. सन 2021 पासून दरवाढ प्रलंबित आहे, असा युक्तिवादही महामंडळाने केला.
‘शहर, तसेच उपनगरात रिक्षा-टॅक्सीचालकांकडून कमी अंतराचे भाडे नाकारण्याच्या घटना वारंवार घडत आहे. रिक्षा-टॅक्सीचालकांच्या अरेरावीमुळे रेल्वे आणि मेट्रो स्थानक परिसरात सातत्याने वाहतूककोंडी होते.
यामुळे आधी रिक्षा-टॅक्सीचालकांनी प्रवासी सेवा सुधारण्याची गरज असून त्यानंतर राज्य सरकारने भाडेवाढ देणे योग्य ठरेल,’ अशी प्रतिक्रिया सामान्य प्रवाशांनी व्यक्त केली.
सुधारित भाडेवाढीनुसार रिक्षा-टॅक्सी मीटरच्या प्रमाणीकरणाची तारीख निश्चित करणे आणि अन्य तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर भाडेवाढ लागू होण्याची तारीख घोषित होणार आहे.हेही वाचा
‘कोल्ड प्ले’साठी मुंबई-अहमदाबाद दरम्यान विशेष रेल्वेगाड्या
कोपरीत 5 फेब्रुवारीपर्यंत चिकन, मटन विक्री दुकाने राहणार बंद