सेंटपॉल्स पर्यावरण मॅरेथॉन मोठ्या उत्साहात
विद्यार्थी विद्यार्थिनींचा मोठा सहभाग
बेळगाव : सेंट पॉल्स स्कूल माजी विद्यार्थी संघटना, पेरेंट्स टीचर्स असोसिएशन यांच्या सैयुक्त विद्दमाने आयोजित पर्यावरण मॅरेथॉन स्पर्धेत प्रवीण अग्रे, क्रांती वेताळ, चित्रेश पाटील, अर्ना आसुंडी, दिव्या हेरेकर, शुशांत जेदा, यांनी आपल्या गटात विजय मिळविला. सेंट पॉल्स स्कूलच्या माजी विद्यार्थी संघटना, पेरेंट टीचर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण वाचवा, ग्रीन सिटी क्लीन सिटी, व अमली पदार्थापासून दूर राहा हा संदेश देत या पर्यावरण मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन आम. राजू शेठ, उद्योगपती सिद्धनाळ, फादर सॅविओ अॅब्रू, फादर सॅबस्टिन परेरा, मोनू सिंग, इतर मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धेचे ध्वज उंचावून करण्यात आले. जवळपास 500 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता.
निकाल : पहिली ते चौथी गट मुलांमध्ये चित्रेश पाटीलने प्रथम, तेजस घोरीने द्वितीय, मुलींमध्ये अर्ना आसुंडीने प्रथम, प्रतीक्षा कुरबरने द्वितीय, पाचवी ते सातवी गट : मुले- प्रेम बुरुडने प्रथम, मनीष बेळगावकरने द्वितीय, आठवी ते दहावी गट : मुलीमध्ये क्रांती वेताळने प्रथम, सृष्टी जुवेकरने द्वितीय, मुलानमध्ये प्रवीण आग्रने प्रथम, वेदांत होसुरकरने द्वितीय, पहिली व दुसरी गट मुलांमध्ये सोम नाईकने प्रथम, श्रेष्ठ हनीकेरीने द्वितीय, अकरावी वरील गट : मुलींमध्ये दिव्या हेरेकरने प्रथम, समीक्षा वेताळने द्वितीय, मुलांमध्ये सुशांत जेदाने प्रथम, सुरेश नाटेकरने द्वितीय क्रमांक पटकाविल. विजेत्या सर्व खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पदके, प्रमाणपत्र, रोख रक्कम व भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी माजी विद्यार्थी संघटनेने परिश्रम घेतले.


Home महत्वाची बातमी सेंटपॉल्स पर्यावरण मॅरेथॉन मोठ्या उत्साहात
सेंटपॉल्स पर्यावरण मॅरेथॉन मोठ्या उत्साहात
विद्यार्थी विद्यार्थिनींचा मोठा सहभाग बेळगाव : सेंट पॉल्स स्कूल माजी विद्यार्थी संघटना, पेरेंट्स टीचर्स असोसिएशन यांच्या सैयुक्त विद्दमाने आयोजित पर्यावरण मॅरेथॉन स्पर्धेत प्रवीण अग्रे, क्रांती वेताळ, चित्रेश पाटील, अर्ना आसुंडी, दिव्या हेरेकर, शुशांत जेदा, यांनी आपल्या गटात विजय मिळविला. सेंट पॉल्स स्कूलच्या माजी विद्यार्थी संघटना, पेरेंट टीचर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण वाचवा, ग्रीन सिटी […]