एसटी चालकास मारहाण बेदम, चालक-वाहकांनी काम केले बंद

देवरुखमधील घटना देवरुख / प्रतिनिधी-: सह्याद्रीनगर येथे रिक्षा पलटी झाल्याचा राग मनात धरून देवरुखमध्ये एसटी चालकास बेदम मारहाण करणाऱ्यास तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी एसटी चालक–वाहकांनी रविवारी सकाळी ११.३० वाजल्यापासून काम बंद आंदोलन सुरू केले. जोपर्यंत मारहाणकर्त्यास अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला होता. या आंदोलनामुळे रविवारी आठवडा बाजारासाठी आलेल्या […]

एसटी चालकास मारहाण बेदम, चालक-वाहकांनी काम केले बंद

देवरुखमधील घटना
देवरुख / प्रतिनिधी-:
सह्याद्रीनगर येथे रिक्षा पलटी झाल्याचा राग मनात धरून देवरुखमध्ये एसटी चालकास बेदम मारहाण करणाऱ्यास तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी एसटी चालक–वाहकांनी रविवारी सकाळी ११.३० वाजल्यापासून काम बंद आंदोलन सुरू केले. जोपर्यंत मारहाणकर्त्यास अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला होता. या आंदोलनामुळे रविवारी आठवडा बाजारासाठी आलेल्या प्रवाशांचा खोळंबा झाला होता. मारहाणकर्ता एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे बोलले जात होते.