बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरचा श्रीराज भोसले विजेता

बेळगाव : केएलएस आयएमईआर महाविद्यालय आयोजित आयएमईआर चषक  निमंत्रितांच्या अखिल भारतीय बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरच्या श्रीराज भोसलेने प्रथम क्रमांक, हुबळीच्या सचिन पै याने दुसरा तर बेळगावच्या श्रीकारा दर्भाने तिसरा क्रमांक पटकाविला. आयएमईआरच्या सभागृहात आयोजित सदर स्पर्धेत कोल्हापूर, हुबळी, धारवाड, बेळगाव येथून अनेक बुद्धिबळ स्पर्धकांनी भाग घेतला होता. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत दहा स्पर्धकांनी आपले विजय […]

बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरचा श्रीराज भोसले विजेता

बेळगाव : केएलएस आयएमईआर महाविद्यालय आयोजित आयएमईआर चषक  निमंत्रितांच्या अखिल भारतीय बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरच्या श्रीराज भोसलेने प्रथम क्रमांक, हुबळीच्या सचिन पै याने दुसरा तर बेळगावच्या श्रीकारा दर्भाने तिसरा क्रमांक पटकाविला. आयएमईआरच्या सभागृहात आयोजित सदर स्पर्धेत कोल्हापूर, हुबळी, धारवाड, बेळगाव येथून अनेक बुद्धिबळ स्पर्धकांनी भाग घेतला होता. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत दहा स्पर्धकांनी आपले विजय निश्चित केले.
निकाल पुढीलप्रमाणे
1) श्रीराज भोसले कोल्हापूर प्रथम क्रमांकासह 5 हजार रुपये रोख, चषक 2) हुबळीचा सचिन पै दुसऱ्या क्रमांकसह 3 हजार रुपये रोख व चषक, 3) बेळगावचा  श्रीकारा दर्भा तिसऱ्या क्रमांकासह 2 हजार रुपये रोख व चषक, 4) हुबळीचा सचितराज शेट्टी चौथ्या क्रमांकासह 1500 रुपये रोख व चषक, 5) धारवाडचा अमान शेख पाचव्या क्रमांकासह एक हजार रुपये रोख व चषक, 6) नील बरेटो बेळगाव, 7) राशी अहमद खान बेळगाव, 8 ) मोहित सिंग बेळगाव, 9) अंश राजण्णवर बेळगाव, 10) मंथन बडवाण्णाचे बेळगाव या पाच स्पर्धकानी पाचशे रुपये रोख व चषक पटकाविले. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे वरिष्ठ बुद्धिबळपटू प्रकाश कुलकर्णी, आयएमईआर महाविद्यालयाचे चेअरमन आर. एस. मुतालिक,  प्राचार्य डॉ. आरिफ शेख आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या सर्व स्पर्धकांना चषक, रोख रक्कम, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत वैयक्तिक बक्षिसे बेस्ट वुमन अचीवमेंट चेस प्लेयर हा पुरस्कार तेजल झंवर व रितू नाईक बेळगाव यांना देऊन खास गौरव करण्यात आला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आयएमईआर महाविद्यालयाचे क्रीडा निर्देशक जॉर्ज रॉड्रिक्स, श्रीनिधी अप्पूगोळ, जोतिबा, धनश्री यांनी विशेष परिश्रम घेतले. ऑर्बिट्रर्स म्हणून गिरीश बाचीकर व आकाश मडिवालर यांनी काम पाहिले.