श्रीकांत शिंदे यांचे काम करणार नाही

कल्याण लोकसभा मतदारसंघातून भाजपाचा उमेदवार द्यावा अन्यथा श्रीकांत शिंदे यांचे काम करणार नाही असं ठराव आज भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे समर्थक असलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी घेतलेल्या बैठकीत करण्यात आला आहे.

श्रीकांत शिंदे यांचे काम करणार नाही

Twitter

कल्याण लोकसभा मतदारसंघातून भाजपाचा उमेदवार द्यावा अन्यथा श्रीकांत शिंदे यांचे काम करणार नाही असं ठराव आज भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे समर्थक असलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी घेतलेल्या बैठकीत करण्यात आला आहे.

ही बैठक आज रात्री उशिरा भाजप आमदार गायकवाड यांच्या कार्यालयात पार पडली यावेळी त्यांचे समर्थक असलेले भाजप कार्यकर्ते या बैठकीस उपस्थित होते. या बैठकीत झालेला ठराव भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवण्यात येणार आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी भाजप आमदार गायकवाड यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली.  

या संदर्भात भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की कल्याण पूर्व येथील भाजप आमदार गायकवाड यांच्या कार्यालयात काय बैठक पार पडली याविषयी मला काही माहिती नाही मी माहिती घेऊन सांगतो मात्र मी या दरम्यान सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पलावा येथील निवासस्थानी निवडणूक संदर्भातील बैठकीत उपस्थित होतो. गणपत गायकवाड यांच्या पाठीशी केवळ कल्याण पूर्वेतील भाजप कार्यकर्ते नाहीत तर संपूर्ण भाजप आहे.

Edited by -Ratnadeep Ranshoor

Go to Source