थंडगार वातावरणात गरम व चटपटीत खाण्याचे मन आहे का? ट्राय करा कुरकुरीत गिलकी पकोडे

साहित्य- गिलकी- दोन मध्यम आकाराचे बेसनाचे पीठ – एक कप तांदळाचे पीठ -दोन टेबलस्पून हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या आले-लसूण पेस्ट – एक टीस्पून तिखट- अर्धा टीस्पून हळद- १/४ टीस्पून

थंडगार वातावरणात गरम व चटपटीत खाण्याचे मन आहे का? ट्राय करा कुरकुरीत गिलकी पकोडे

साहित्य-
गिलकी- दोन मध्यम आकाराचे
बेसनाचे पीठ – एक कप
तांदळाचे पीठ -दोन टेबलस्पून
हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
आले-लसूण पेस्ट – एक टीस्पून
तिखट- अर्धा टीस्पून
हळद- १/४ टीस्पून
धणे पूड – एक टीस्पून
मीठ चवीनुसार
कोथिंबीर
पाणी
तेल

ALSO READ: कुरकुरीत लच्छा पकोडे खाऊन पाहुणे होतील खुश जाणून घ्या रेसिपी
कृती-
गिलकी पकोडे बनवण्यासाठी सर्वात आधी गिलकी धुवून सोलून घ्या आणि त्यांचे पातळ, गोल काप  करा. आताएका भांड्यात बेसन, तांदळाचे पीठ, मसाले, आले-लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या आणि मीठ एकत्र करा. हळूहळू पाणी घालून जाड पण गुळगुळीत पीठ तयार करा. आता कढईत तेल गरम करा. मध्यम आचेवर ठेवा जेणेकरून पकोडे बाहेरून कुरकुरीत होतील आणि आतून पूर्णपणे शिजतील.
प्रत्येक गिलकीचा तुकडा पिठात बुडवा, गरम तेलात टाका आणि सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा. पकोडे किचन पेपरवर काढून घ्या जेणेकरून जास्तीचे तेल निघून जाईल. तर चला तयार आहे गिलकी पकोडे रेसिपी, हिरव्या चटणी सोबत गरम सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

ALSO READ: Rainy Season Recipe बनवा टेस्टी ब्रेड पकोडे
Edited By- Dhanashri Naik

ALSO READ: कुरकुरीत आळूच्या पानाचे पकोडे