महापौर-उपमहापौर निवडणुकीच्या कामाला गती
केवळ पाच दिवस शिल्लक : संधी कोणाला मिळणार?
बेळगाव : महानगरपालिकेची महापौर-उपमहापौर निवडणूक 15 फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहे. कौन्सिल विभागाचे अधिकारी व कर्मचारी या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. कागदपत्रांची जुळवाजुळव करणे याचबरोबर निवडणुकीसंदर्भातील नियमांची पडताळणी करून त्यानुसार फाईल तयार करण्याच्या कामाला या कर्मचाऱ्यांनी सुरुवात केली आहे. प्रादेशिक आयुक्त शट्याण्णावर यांनी महापौर-उपमहापौर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्या कार्यक्रमानुसार कौन्सिल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कामाला सुरुवात केली असून कायदा सल्लागार यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू आहे. या निवडणुकीला केवळ पाच दिवस बाकी आहेत. त्यामुळे महानगरपालिकेने जोरदार तयारी केली आहे. दरम्यान, महानगरपालिकेवर सध्या भाजपची सत्ता आहे. त्यामुळे महापौर-उपमहापौर भाजपचाच होण्याची शक्यता आहे. सध्या भाजपमध्ये या दोन्ही पदासाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे.
बऱ्याच जणांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. महापौर अनुसूचित महिलेसाठी तर उपमहापौर सामान्य आल्याने उपमहापौर पदासाठीच शर्यत लागली आहे. अनुसूचित महिला सत्ताधारी गटामध्ये दोन आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये एका महिलेला संधी दिली जाणार. उपमहापौर सामान्य आल्याने अनेक नगरसेवक याचबरोबर नगरसेविकांही या पदासाठी इच्छुक आहेत. मनपातील एकूणच राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेसदेखील अपक्ष तसेच म. ए. समितीच्या नगरसेवकांना घेऊन या दोन्ही पदावर आपले वर्चस्व दाखविण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे सत्ताधारी गटामध्ये जर फूट पडली तर काँग्रेसलाही संधी मिळण्याची शक्यता आहे. एकूण 65 मतदार आहेत. त्यामधील 39 मतदार सत्ताधारी गटाकडे आहेत. तसेच दोन अपक्ष मतदारांचे बळही त्यांना मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस, अपक्ष, म. ए. समिती व एमआयएम यांच्याकडे 24 मतदार आहेत. भाजप व काँग्रेसमध्ये जरी अधिक फरक असला तरी सत्ताधारी गटात फूट पडली तरी तीच संधी काँग्रेस साधण्याच्या तयारीत आहे.
Home महत्वाची बातमी महापौर-उपमहापौर निवडणुकीच्या कामाला गती
महापौर-उपमहापौर निवडणुकीच्या कामाला गती
केवळ पाच दिवस शिल्लक : संधी कोणाला मिळणार? बेळगाव : महानगरपालिकेची महापौर-उपमहापौर निवडणूक 15 फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहे. कौन्सिल विभागाचे अधिकारी व कर्मचारी या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. कागदपत्रांची जुळवाजुळव करणे याचबरोबर निवडणुकीसंदर्भातील नियमांची पडताळणी करून त्यानुसार फाईल तयार करण्याच्या कामाला या कर्मचाऱ्यांनी सुरुवात केली आहे. प्रादेशिक आयुक्त शट्याण्णावर यांनी महापौर-उपमहापौर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर […]