कोस्टल रोडवरून भरधाव कार थेट समुद्रात कोसळली
मुंबईतील वरळी कोस्टल पुलावरून एक धक्कादायक अपघात झाला आहे. सोमवारी रात्री वरळीहून वांद्रेकडे जाणाऱ्या कोस्टल ब्रिजवर आर्टिगा कारचे नियंत्रण सुटले. त्यामुळे कारने पुलाची रेलिंग तोडली आणि ती थेट समुद्राच्या पाण्यात कोसळली.या अपघाताच्या वेळी कारमध्ये चालक एकटाच होता. कार समुद्राच्या पाण्यात कोसळतानाचे हे दृश्य पाहून, तिथे कर्तव्यावर तैनात असलेले महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान तातडीने धावले. या जवानांनी क्षणाचाही विलंब न लावता समुद्रात उडी घेतली.जवान खोल पाण्यात पोहोचले आणि त्यांनी चालकाला गाडीतून बाहेर काढले. त्यानंतर दोरीच्या मदतीने त्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. महाराष्ट्र सुरक्षा बलच्या जवानांनी दाखवलेले हे धाडस आणि वेळेवर केलेल्या मदतीमुळे मोठा अनर्थ टळला. वरळी पोलीस या घटनेबाबत आवश्यक कायदेशीर कारवाई करत आहेत.हेही वाचानवी मुंबई: 14 गावांचा महानगरपालिकेत समावेश करण्यास विरोध
BMC Election साठी प्रभाग रचना जाहीर
Home महत्वाची बातमी कोस्टल रोडवरून भरधाव कार थेट समुद्रात कोसळली
कोस्टल रोडवरून भरधाव कार थेट समुद्रात कोसळली
मुंबईतील वरळी कोस्टल पुलावरून एक धक्कादायक अपघात झाला आहे. सोमवारी रात्री वरळीहून वांद्रेकडे जाणाऱ्या कोस्टल ब्रिजवर आर्टिगा कारचे नियंत्रण सुटले. त्यामुळे कारने पुलाची रेलिंग तोडली आणि ती थेट समुद्राच्या पाण्यात कोसळली.
या अपघाताच्या वेळी कारमध्ये चालक एकटाच होता. कार समुद्राच्या पाण्यात कोसळतानाचे हे दृश्य पाहून, तिथे कर्तव्यावर तैनात असलेले महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान तातडीने धावले. या जवानांनी क्षणाचाही विलंब न लावता समुद्रात उडी घेतली.
जवान खोल पाण्यात पोहोचले आणि त्यांनी चालकाला गाडीतून बाहेर काढले. त्यानंतर दोरीच्या मदतीने त्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. महाराष्ट्र सुरक्षा बलच्या जवानांनी दाखवलेले हे धाडस आणि वेळेवर केलेल्या मदतीमुळे मोठा अनर्थ टळला. वरळी पोलीस या घटनेबाबत आवश्यक कायदेशीर कारवाई करत आहेत.हेही वाचा
नवी मुंबई: 14 गावांचा महानगरपालिकेत समावेश करण्यास विरोधBMC Election साठी प्रभाग रचना जाहीर