विशेष रेल्वेमुळे नैर्त्रुत्य रेल्वेच्या महसुलात वाढ
355 विशेष रेल्वेतून 171 कोटींचा महसूल
बेळगाव : नैर्त्रुत्य रेल्वेने दिवाळी, दसरा, गणेशोत्सव,छटपूजा व कार्तिक वारीसाठी सुरू केलेल्या विशेष रेल्वेतून मोठ्या प्रमाणात महसूल जमा केला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी 23 टक्क्यांनी महसुलात वाढ झाली आहे. एप्रिल ते ऑक्टोबर या काळात नैर्त्रुत्य रेल्वेने 355 विशेष रेल्वे सुरू केल्या होत्या. त्यातून 171 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. मागील वर्षी 351 विशेष रेल्वे फेऱ्यांमधून 138 कोटी रुपये महसूल जमा झाला होता. यावर्षी एकूण 19.55 लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. या विशेष रेल्वेमुळे महसुलात मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. उन्हाळी सुट्या, गणेशोत्सव, दिवाळी, दसरा, छटपूजा तसेच कार्तिक वारी यामधून मोठ्या संख्येने प्रवाशांनी ये- जा केल्याचे दिसून आले आहे. गर्दीच्यावेळी काही महत्त्वाच्या एक्स्प्रेसना अधिकचे डबे जोडण्यात आले होते. दैनंदिन धावणाऱ्या एक्स्प्रेसना 521 अधिकचे कोच जोडण्यात आले. यामधून 24 हजार 520 प्रवाशांनी रेल्वे प्रवास केला आहे. यातून 2.09 कोटी रुपये इतका महसूल रेल्वेला मिळाला आहे. त्यामुळे विशेष रेल्वे तसेच रेल्वेला जोडण्यात आलेले डबे रेल्वेला फायदेशीर ठरले आहेत.
Home महत्वाची बातमी विशेष रेल्वेमुळे नैर्त्रुत्य रेल्वेच्या महसुलात वाढ
विशेष रेल्वेमुळे नैर्त्रुत्य रेल्वेच्या महसुलात वाढ
355 विशेष रेल्वेतून 171 कोटींचा महसूल बेळगाव : नैर्त्रुत्य रेल्वेने दिवाळी, दसरा, गणेशोत्सव,छटपूजा व कार्तिक वारीसाठी सुरू केलेल्या विशेष रेल्वेतून मोठ्या प्रमाणात महसूल जमा केला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी 23 टक्क्यांनी महसुलात वाढ झाली आहे. एप्रिल ते ऑक्टोबर या काळात नैर्त्रुत्य रेल्वेने 355 विशेष रेल्वे सुरू केल्या होत्या. त्यातून 171 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. मागील […]
