मीराबाई चानूसाठी खास प्रशिक्षण

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली येत्या जुलै-ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारताची माजी विश्वचॅम्पियन महिला वेटलिफ्टर मीराबाई चानूसाठी खास प्रशिक्षण शिबिराच्या आयोजनाचा प्रस्ताव ठेवण्यात आला असून त्याला क्रीडा मंत्रालयाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत 29 वर्षीय मीराबाई चानूने भारताला रौप्यपदक मिळवून दिले होते. आता पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतही मीराबाईकडून पदकाची अपेक्षा बळगली जात […]

मीराबाई चानूसाठी खास प्रशिक्षण

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येत्या जुलै-ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारताची माजी विश्वचॅम्पियन महिला वेटलिफ्टर मीराबाई चानूसाठी खास प्रशिक्षण शिबिराच्या आयोजनाचा प्रस्ताव ठेवण्यात आला असून त्याला क्रीडा मंत्रालयाकडून हिरवा कंदील मिळाला आहे.
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत 29 वर्षीय मीराबाई चानूने भारताला रौप्यपदक मिळवून दिले होते. आता पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतही मीराबाईकडून पदकाची अपेक्षा बळगली जात आहे. या स्पर्धेसाठी मीराबाईने आतापासूनच जोरदार सरावाला प्रारंभ केला आहे. मीराबाई चानू पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत 49 किलो वजन गटाचे प्रतिनिधीत्व करेल. या स्पर्धेसाठी मीराबाई चानूला विदेशात खास प्रशिक्षणासाठी पाठविण्याची योजना निश्चित करण्यात आली आहे. प्रशिक्षणासाठी हवाई प्रवासाचा खर्च तसेच इतर खर्चाची सर्व जबाबदारी शासनाकडून केली जाणार आहे.