Rath Saptami 2026 रथ सप्तमीच्या दिवशी सूर्याला अर्पण करा हा विशेष नैवेद्य

उद्या २५ जानेवारी २०२६ रोजी ‘रथ सप्तमी’ आहे. या दिवसाला ‘सूर्य जयंती’ असेही म्हणतात, कारण असे मानले जाते की याच दिवशी भगवान सूर्याचा जन्म झाला होता. रथ सप्तमीच्या दिवशी सूर्याला अर्पण केल्या जाणाऱ्या नैवेद्याला विशेष धार्मिक आणि आरोग्यदायी महत्त्व …

Rath Saptami 2026 रथ सप्तमीच्या दिवशी सूर्याला अर्पण करा हा विशेष नैवेद्य

उद्या २५ जानेवारी २०२६ रोजी ‘रथ सप्तमी’ आहे. या दिवसाला ‘सूर्य जयंती’ असेही म्हणतात, कारण असे मानले जाते की याच दिवशी भगवान सूर्याचा जन्म झाला होता. रथ सप्तमीच्या दिवशी सूर्याला अर्पण केल्या जाणाऱ्या नैवेद्याला विशेष धार्मिक आणि आरोग्यदायी महत्त्व आहे. तसेच महाराष्ट्रात रथ सप्तमीनिमित्त प्रामुख्याने दूध उतू घालवणे आणि खिरीचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे.  

 

पारंपारिक ‘दूध उतू घालवणे’ विधी

रथ सप्तमीला अंगणात किंवा तुळशीसमोर सूर्याच्या साक्षिने दूध उकळण्याची प्रथा आहे.

 

विधी: एका मातीच्या छोट्या भांड्यात सुगडात किंवा बोळक्यात दूध, तांदूळ आणि थोडी साखर घालून ते अग्नीवर ठेवले जाते.

 

महत्त्व: हे दूध उकळून ज्या दिशेला उतू जाईल, त्यावरून आगामी वर्ष कसे जाईल याचा अंदाज बांधला जातो. दूध उत्तर किंवा पूर्व दिशेला उतू जाणे अतिशय शुभ मानले जाते. हे उतू गेलेले दूध म्हणजे अग्नीला दिलेला नैवेद्य असतो.

 

तांदळाची खीर रेसिपी 

सूर्याला प्रसन्न करण्यासाठी गायीच्या दुधाची खीर सर्वश्रेष्ठ मानली जाते.

साहित्य-

१ लिटर गायीचे दूध, अर्धी वाटी बासमती तुकडा तांदूळ धुवून वाळवलेला, ३/४ वाटी गूळ किंवा साखर, वेलची-जायफळ पूड, साजूक तूप, आणि ड्राय फ्रूट्सचे काप.

ALSO READ: Ratha Saptami 2026 रथ सप्तमी बद्दल संपूर्ण माहिती

कृती-

सर्वात आधी एका जड बुडाच्या पातेल्यात १ चमचा तूप गरम करून तांदूळ हलके परतून घ्या. त्यात दूध घालून मंद आचेवर तांदूळ शिजेपर्यंत उकळा. तांदूळ पूर्ण शिजल्यावर आणि दूध थोडे आटल्यावर त्यात साखर किंवा गूळ घाला. गूळ घालणार असाल तर गॅस बंद करून थोड्या वेळाने घाला, म्हणजे दूध फाटणार नाही.

शेवटी वेलची-जायफळ पूड आणि ड्राय फ्रूट्स घालून गरम किंवा कोमट खीर नैवेद्यात अर्पण करा.

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

ALSO READ: Sweet Dish चविष्ट केळीची खीर

Edited By- Dhanashri Naik