एशियन पदक विजेत्या गणेश पाटीलचा खास सत्कार

के. आर. रत्नाकर शेट्टी-मोरया जिमच्यावतीने गौरव  बेळगाव : एशियन बॉडिबिल्डींग फेडरेशन आयोजित साऊथ एशियन शरीरसौष्ठव स्पर्धेत ज्युनियर व सिनियर गटात बेळगावचा शरीरसौष्ठवपटू गणेश पाटील याने कास्यपदक पटकावित बेळगावचे नाव शरीरसौष्ठव क्षेत्रात उज्ज्वल केले आहे. त्यामुळे के. आर. रत्नाकर शेट्टी स्पोर्ट्स फौंडेशन व मोरया व्यायाम शाळेतर्फे त्याचा गौरव करण्यात आला. मालदीव येथे वर्ल्ड बॉडिबिल्डींग फेडरेशन व एशियन बॉडिबिल्डींग फेडरेशनच्यावतीने […]

एशियन पदक विजेत्या गणेश पाटीलचा खास सत्कार

के. आर. रत्नाकर शेट्टी-मोरया जिमच्यावतीने गौरव 
बेळगाव : एशियन बॉडिबिल्डींग फेडरेशन आयोजित साऊथ एशियन शरीरसौष्ठव स्पर्धेत ज्युनियर व सिनियर गटात बेळगावचा शरीरसौष्ठवपटू गणेश पाटील याने कास्यपदक पटकावित बेळगावचे नाव शरीरसौष्ठव क्षेत्रात उज्ज्वल केले आहे. त्यामुळे के. आर. रत्नाकर शेट्टी स्पोर्ट्स फौंडेशन व मोरया व्यायाम शाळेतर्फे त्याचा गौरव करण्यात आला. मालदीव येथे वर्ल्ड बॉडिबिल्डींग फेडरेशन व एशियन बॉडिबिल्डींग फेडरेशनच्यावतीने घेतलेल्या साऊथ एशियन बॉडिबिल्डिंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बेळगाव, कर्नाटकचा शरीरसौष्ठवपटू गणेश पाटील याने ज्युनियर गटात 75 किलो वजनी गटात अंतिम फेरीत धडक मारत कास्यपदक पटकाविले. तर याच स्पर्धेत वरिष्ठ गटात 70 किलो वजनी गटात भाग घेत अंतिम फेरीत मजल मारून कास्यपदक पटकाविले. एकाच स्पर्धेत दोन विभागात पदक पटकाविणारा गणेश हा बेळगावचा पहिला शरीरसौष्ठवपटू आहे.
यापूर्वी गणेशने केरळ येथे झालेल्या साऊथ इंडिया शरीरसौष्ठव स्पर्धेत चौथा क्रमांक पटकाविला होता. तर दिल्ली येथे झालेल्या ज्युनियर मिस्टर इंडिया स्पर्धेत 65 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावित.ज्युनियर मिस्टर इंडिया हा किताब पटकाविला होता. त्याची दखल घेऊन साऊथ एशियन स्पर्धेसाठी त्याची निवड झाली होती. ताशिलदार गल्ली येथील मोरया जिमच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या सत्कार समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून के. आर. रत्नाकर शेट्टी स्पोर्ट्स फौंडेशनचे संचालक प्रणय शेट्टी, मोरया जिमचे संचालक शेखर जानवेकर, मिलिंद बेळगावकर, श्रीधर पाटील, गौरांग गेंजी, राजू पाटील, नीता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते गणेशला शाल, श्रीफळ भेटवस्तू व रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला. गणेशच्या या कामगिरीची दखल घेऊन एम-9 या कंपनीने गणेशला सहा महिन्यांची शरीरसौष्ठव स्पर्धेच्या तयारीसाठी लागणारी संपूर्ण खुराकाची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी के. आर. शेट्टी स्पोर्ट्स फौंडेशनचे अध्यक्ष प्रणय शेट्टी यांनी गणेशला शुभेच्छा देऊन बेळगावच्या होतकरू शरीरसौष्ठवपटूंनी गणेशने केलेले यश पाहून आपणही पदके मिळू शकतो अशी जिद्द बाळगून तयारी करावी. तसेच यासाठी आपण सर्व शरीरसौष्ठवपटूंना मदत करू असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी गणेशचे प्रशिक्षक शेखर जाणवेकर व गौरांग गेंजी यांचा सत्कार करण्यात आला. गणेशला प्रशिक्षक शेखर जाणवेकर व गौरांग गेंजी यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. तसेच वडील राजू पाटील व आई गीता यांचे प्रोत्साहन लाभत आहे. आर्यन पाटील, रघु मेदार, पिंटू शिंदोळकर, सुशांत, अमित मोरे, अमृत कांगले, विश्वास दळवी, आदित्य सैनूचे, वेदांत पवार, बिलाल शेख, समेद्य विवेक, महेश, सुनील, तरुण पुजारी, श्रीपाद आदी शरीरसौष्ठवपटू यावेळी उपस्थित होते.