देवभूमी उत्तराखंडसाठी धावणार विशेष एक्स्प्रेस
बेळगाव : उन्हाळी सुट्यांसाठी नैर्त्रुत्य रेल्वेने हुबळी-ऋषिकेश या मार्गावर विशेष रेल्वेसेवा सुरू केली आहे. ही एक्स्प्रेस बेळगावमधून धावत असल्याने येथील प्रवाशांची सोय होणार आहे. बेळगावमधून पहिल्यांदाच उत्तराखंड-ऋषिकेश येथे जाण्यासाठी थेट एक्स्प्रेस उपलब्ध झाली असल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे. हुबळी-ऋषिकेश (06225) एक्स्प्रेस 29 एप्रिल, 6, 13, 20 व 27 मे रोजी धावणार आहे. तर ऋषिकेश-हुबळी एक्स्प्रेस (06226) 2, 9, 16, 23 व 30 मे रोजी धावणार आहे. एकूण 22 डबे एक्स्प्रेसला जोडले आहेत. रात्री 9.45 वा. हुबळी येथून निघालेली एक्स्प्रेस मध्यरात्री 12.25 वा. बेळगावला पोहोचेल त्यानंतर ऋषिकेशच्या दिशेने मार्गस्थ होईल. बेळगावहून ऋषिकेश, उत्तराखंड येथील पर्यटनस्थळासाठी ही एक्स्प्रेस महत्त्वाची ठरणार आहे.
हुबळी-मुजफ्फराबाद विशेष रेल्वे
नैर्त्रुत्य रेल्वेने हुबळी-मुजफ्फराबाद या मार्गावर पाच रेल्वेफेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हुबळी-मुजफ्फराबाद एक्स्प्रेस 30 एप्रिल, 7, 14, 21, 28 मे तर मुजफ्फराबाद-हुबळी एक्स्प्रेस 3, 10, 17, 24, 31 मे दरम्यान धावणार आहे. ही एक्स्प्रेस धारवाड, बेळगाव, घटप्रभा, मिरज, पुणे, अहमदनगर यामार्गे मुजफ्फराबाद येथे पोहोचणार आहे. त्यामुळे बेळगावहून मुजफ्फराबाद परिसरात जाण्यासाठी एक्स्प्रेस महत्त्वाची ठरणार आहे.
Home महत्वाची बातमी देवभूमी उत्तराखंडसाठी धावणार विशेष एक्स्प्रेस
देवभूमी उत्तराखंडसाठी धावणार विशेष एक्स्प्रेस
बेळगाव : उन्हाळी सुट्यांसाठी नैर्त्रुत्य रेल्वेने हुबळी-ऋषिकेश या मार्गावर विशेष रेल्वेसेवा सुरू केली आहे. ही एक्स्प्रेस बेळगावमधून धावत असल्याने येथील प्रवाशांची सोय होणार आहे. बेळगावमधून पहिल्यांदाच उत्तराखंड-ऋषिकेश येथे जाण्यासाठी थेट एक्स्प्रेस उपलब्ध झाली असल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे. हुबळी-ऋषिकेश (06225) एक्स्प्रेस 29 एप्रिल, 6, 13, 20 व 27 मे रोजी धावणार आहे. तर ऋषिकेश-हुबळी […]