वर्षापर्यटनासाठी विशेष बससेवा

गोकाक फॉल्स दर्शनाचे परिवहनकडून नियोजन बेळगाव : पर्यटकांना वर्षापर्यटनाचा आनंद लुटता यावा यासाठी परिवहनकडून गोकाक फॉल्सला विशेष बसची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. महिन्यातील दुसरा, चौथा शनिवार, दर रविवार आणि शासकीय सुटी दिवशी ही बस धावणार आहे. मध्यवर्ती बसस्थानकातून सकाळी 9 वाजता ही बस सुटणार आहे. हिडकल डॅम, गोडचिनमलकी आणि गोकाक फॉल्सला भेट देऊन पुन्हा सायंकाळी माघारी परतणार आहे. […]

वर्षापर्यटनासाठी विशेष बससेवा

गोकाक फॉल्स दर्शनाचे परिवहनकडून नियोजन
बेळगाव : पर्यटकांना वर्षापर्यटनाचा आनंद लुटता यावा यासाठी परिवहनकडून गोकाक फॉल्सला विशेष बसची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. महिन्यातील दुसरा, चौथा शनिवार, दर रविवार आणि शासकीय सुटी दिवशी ही बस धावणार आहे. मध्यवर्ती बसस्थानकातून सकाळी 9 वाजता ही बस सुटणार आहे. हिडकल डॅम, गोडचिनमलकी आणि गोकाक फॉल्सला भेट देऊन पुन्हा सायंकाळी माघारी परतणार आहे. मागील आठवड्यापासून पावसाचा जोर वाढू लागला आहे. त्यामुळे नदी-नाले आणि जलाशयांच्या पाणीपातळीतही वाढ होऊ लागली आहे. विशेषत: धबधबे प्रवाहित झाले आहेत. त्यामुळे पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे. पर्यटकांच्या सोयीखातर परिवहनने गोकाक फॉल्ससाठी विशेष बसची व्यवस्था केली आहे. प्रवाशांना बसस्थानकात आगाऊ तिकीट बुकिंग करता येणार आहे. किंवा www.ksrtc.in या वेबसाईटवर ऑनलाईन तिकीट बुकिंगची सोय उपलब्ध आहे. परिवहनकडून दरवर्षी पावसाळ्यात प्रेक्षणीय स्थळांसाठी विशेष बससेवा उपलब्ध करून दिली जाते. यंदा गोकाक धबधब्यासाठी बससेवा उपलब्ध केली आहे. त्यामुळे पर्यटक व नागरिकांना गोकाकचा धबधबा जवळून पाहता येणार आहे. या विशेष बससेवेला पर्यटकांचा उदंड प्रतिसाद मिळतो. यंदादेखील या बससेवेला प्रतिसाद वाढेल, अशी अपेक्षाही परिवहनला आहे.
बसचे वेळापत्रक
मध्यवर्ती बसस्थानकातून सकाळी 9 वाजता गोकाककडे बस धावणार आहे. सकाळी 10.30 वाजता हिडकल डॅम, 12 वाजता गोडचिनमलकी तर 2 वाजता गोकाक फॉल्सला पोहोचणार आहे. पुन्हा सायंकाळी 6 वाजता बस बेळगावात पोहोचणार आहे.