बेळगाव-मोदगा मार्गावर विशेष बससेवा

भावेश्वरी यात्राकाळात धावणार जादा 30 बसेस, प्रवाशांची सोय प्रतिनिधी/ बेळगाव कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दड्डी-मोहनगा श्री भावेश्वरी देवी यात्रोत्सवाला रविवारपासून प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकातून अतिरिक्त बस सोडल्या जाणार आहेत. मोहनगा- दड्डी  यात्रेला बेळगाव परिसरातून जाणाऱ्या भक्तांची संख्या मोठी आहे. प्रवाशांच्या सोयीखातर बेळगाव-दड्डी […]

बेळगाव-मोदगा मार्गावर विशेष बससेवा

भावेश्वरी यात्राकाळात धावणार जादा 30 बसेस, प्रवाशांची सोय
प्रतिनिधी/ बेळगाव
कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दड्डी-मोहनगा श्री भावेश्वरी देवी यात्रोत्सवाला रविवारपासून प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकातून अतिरिक्त बस सोडल्या जाणार आहेत.
मोहनगा- दड्डी  यात्रेला बेळगाव परिसरातून जाणाऱ्या भक्तांची संख्या मोठी आहे. प्रवाशांच्या सोयीखातर बेळगाव-दड्डी मार्गावर जादा 30 बसेस सोडल्या जाणार आहेत. गतवर्षी या यात्रेतून परिवहनला साडेसात लाखांचा महसूल प्राप्त झाला होता. त्यामुळे यंदादेखील मोदगा यात्रेतून समाधानकारक उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा परिवहनला आहे.
बेळगाव-मोदगा तिकीट दर मोठ्यांसाठी 80 रुपये तर हाफ तिकीट दर 40 रुपये आकारणी केली जाणार आहे. विशेषत: शक्ती योजनेंतर्गत महिलांना मोफत प्रवास दिला जाणार आहे. भावेश्वरी देवीची यात्रा तीन दिवस म्हणजेच मंगळवारपर्यंत चालणार आहे. याकाळात देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांची संख्या अधिक राहणार आहे. यासाठी बेळगाव बसस्थानकातून जादा बसेसची सोय करण्यात आली आहे.