दक्षिण आफ्रिका महिला संघाचा भारत दौरा

वृत्तसंस्था/ बेंगळूर दक्षिण आफ्रिकेचा महिला क्रिकेट संघ येत्या जून-जुलै दरम्यान भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यामध्ये उभय संघात एक कसोटी, तीन वनडे आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळविली जाणार आहे. सदर माहिती कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या प्रवक्त्याने दिली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघातील वनडे आणि टी-20 मालिका बेंगळूरमध्ये होणार आहे. बेंगळूरच्या चिन्नास्वामी […]

दक्षिण आफ्रिका महिला संघाचा भारत दौरा

वृत्तसंस्था/ बेंगळूर
दक्षिण आफ्रिकेचा महिला क्रिकेट संघ येत्या जून-जुलै दरम्यान भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यामध्ये उभय संघात एक कसोटी, तीन वनडे आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळविली जाणार आहे. सदर माहिती कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या प्रवक्त्याने दिली आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघातील वनडे आणि टी-20 मालिका बेंगळूरमध्ये होणार आहे. बेंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर वनडे मालिकेला जून 16 पासून प्रारंभ होईल. त्यानंतर उभय संघातील एकमेव कसोटी एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर 28 जूनपासून खेळविली जाणार आहे. ही एकमेव कसोटी झाल्यानंतर दोन्ही संघ पुन्हा बेंगळूरमध्ये दाखल होतील. बेंगळूरमध्ये उभय संघात 5, 7, 9 जुलै रोजी टी-20 चे तीन सामने आयोजित केले आहेत. येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान बांगलादेशमध्ये होणाऱ्या आयसीसीच्या महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपूर्वी सरावाकरीता ही मालिका भारतीय क्रिकेट मंडळाने निश्चित केली आहे. गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात मुंबईत भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया बरोबर एकमेव कसोटी सामना खेळला होता. भारतीय महिला संघाने या एकमेव कसोटीत इंग्लंडचा 347 धावांनी तर दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 8 गड्यांनी पराभव केला होता.