दक्षिण आफ्रिका, आयर्लंडची विजयी सलामी

वृत्तसंस्था/ पॉचेफस्ट्रुम, दक्षिण आफ्रिका 15 व्या 19 वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने चुरशीच्या सामन्यात वेस्ट इंडिजच्या जुवेल अँड्य्रूने शतक झळकावूनही विजय मिळविता आल नाही. तर दुसऱ्या लढतीत आयर्लंडने अमेरिकेचा सहज पराभव केला. पॉचेफस्ट्रुम येथे नाणेफेक जिंकल्यानंतर वेस्ट इंडिजचा कर्णधार स्टीफन पास्कलने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यजमानांच्या ल्हुआन-ड्रे प्रिटोरियसने सुऊवातीच्या टप्प्यात केलेली […]

दक्षिण आफ्रिका, आयर्लंडची विजयी सलामी

वृत्तसंस्था/ पॉचेफस्ट्रुम, दक्षिण आफ्रिका
15 व्या 19 वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने चुरशीच्या सामन्यात वेस्ट इंडिजच्या जुवेल अँड्य्रूने शतक झळकावूनही विजय मिळविता आल नाही. तर दुसऱ्या लढतीत आयर्लंडने अमेरिकेचा सहज पराभव केला. पॉचेफस्ट्रुम येथे नाणेफेक जिंकल्यानंतर वेस्ट इंडिजचा कर्णधार स्टीफन पास्कलने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यजमानांच्या ल्हुआन-ड्रे प्रिटोरियसने सुऊवातीच्या टप्प्यात केलेली फटकेबाजी, डेव्हिड टिगर व कर्णधार जुआन जेम्सच्या खेळी, दिवान माराईसने केवळ 33 चेंडूंत केलेले अर्धशतक यांच्या जोरावर 50 षटकांत 285 धावा काढल्या.
वेस्ट इंडिजच्या डावात दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा वेगवान गोलंदाज क्वेना माफाकाने त्याच्या स्पेलच्या पहिल्या 12 चेंडूंमध्येच तीन बळी टिपले. 10 व्या षटकाच्या अखेरीस वेस्ट इंडिज 7.3 अशी गती चांगली असली, तरी त्यांची अर्धी बाजू परतली होती. त्यानंतर ज्वेल अँड्य्रू आणि नॅथन सिली यांनी 15 षटकांमध्ये जवळपास 100 धावा जोडून संघाचे आव्हान कायम ठेवले. सिली 190 धावसंख्येवर धावबाद झाल्यानंतर अँड्य्रूने तारिक आणि नॅथन एडवर्ड यांना घेऊन डाव पुढे रेटला. पण अँड्य्रू 130 धावांवर बाद झाल्यानंतर वेस्ट इंडिजच्या शेवटच्या आशा संपुष्टात आल्या.
दुसऱ्या सामन्यात आयर्लंडने ब्लूमफाँटेन येथे अमेरिकेचा सात गडी राखून पराभव केला. नाणेफेक जिंकून आयर्लंडचा कर्णधार फिलिप्स ले रॉक्सने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर अमेरिकेचा डाव अवघ्या 105 धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर आयर्लंडने तीन गडी गमावून 109 धावा काढून सहज विजय नोंदवला.
संक्षिप्त धावफलक-दक्षिण आफ्रिका 50 षटकांत 9 बाद 285 (ल्हुआन-ड्रे प्रिटोरियस 40, डेव्हिड टीगर 44, दिवान माराईस 65, जुआन जेम्स 47, एडवर्ड 2-63, जेम्स 2-38, नॅथन सिली 3-34), वेस्ट इंडिज 40.1 षटकांत सर्व बाद 254 (जुवेल अँड्य्रू 130, नॅथन सिली 33, माफाका 5-38, नॉर्टन 3-66, टीगर 1-18).
अमेरिका 40.2 ष्wाटकांत सर्व बाद 105 (खुश भलाला 22, पार्थ पटेल 13, विल्सन 3-23, रिले 3-21, मॅकनाली 2-17, मॅककुलॉ 1-23, मॅकबेथ 1-17) आयर्लंड 22.5 षटकांत 3 बाद 109 (रायन हंटर 50, कियान हिल्टन 23, फिलिपस ले रॉक्स 23, गर्ग 2-31, भलाल 1-10)