रोजगारासाठी होणारे स्थलांतर रोखण्यासाठी लवकरच हेल्पलाईन
जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांची माहिती
बेळगाव : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर रोखण्यासाठी रोजगार हमी योजनेतून मुबलक प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तर स्थलांतर रोखण्यासाठी लवकरच हेल्पलाईन सुरू करण्यात येईल, असे जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दुष्काळ परिस्थिती उद्भवल्याने रोजगारासाठी नागरिक परराज्यांमध्ये स्थलांतरित होत आहेत. यामध्ये रामदुर्ग, सौंदत्ती आदी दुष्काळग्रस्त तालुक्यातील नागरिकांचा समावेश आहे, असे पत्रकारांनी कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांना विचारले. यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी रोजगारासाठी स्थलांतर होणे ही नियमित प्रक्रिया आहे. मात्र दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर स्थलांतरित होत नाहीत. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी रोजगार हमी योजनेतून मुबलक प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे स्थलांतरित होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आपल्याकडे रोजगार हमीतून रोजगार देण्यासाठी मुबलक प्रमाणात काम आहे. स्थलांतर रोखण्यासाठी लवकरच हेल्पलाईन सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Home महत्वाची बातमी रोजगारासाठी होणारे स्थलांतर रोखण्यासाठी लवकरच हेल्पलाईन
रोजगारासाठी होणारे स्थलांतर रोखण्यासाठी लवकरच हेल्पलाईन
जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांची माहिती बेळगाव : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर रोखण्यासाठी रोजगार हमी योजनेतून मुबलक प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तर स्थलांतर रोखण्यासाठी लवकरच हेल्पलाईन सुरू करण्यात येईल, असे जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दुष्काळ परिस्थिती उद्भवल्याने रोजगारासाठी नागरिक परराज्यांमध्ये स्थलांतरित होत […]