सुभाषनगरातील समस्या सोडवा
बेळगाव : सुभाषनगर येथे रस्ते, पाणी या समस्या भेडसावत आहेत. त्यामुळे येथील जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या दोन्ही समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. गेल्या काही वर्षांपासून या परिसरातील रस्ते पूर्ण खराब झाले आहेत. विशेष करून क्रॉस क्रमांक दुसरा येथे तर रस्त्यांवर मोठमोठे ख•s पडले आहेत. पाणी समस्या तर गंभीर बनली आहे. आठ दिवसांतून एकदा पाणी पुरवठा केला जात आहे. या पुढे तर आणखीनच ही समस्या गंभीर बनणार आहे. तेव्हा तातडीने या दोन्ही समस्या सोडवाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे
पाणी समस्या दूर करण्यासाठी ठोस पावले उचला
वॉर्ड क्रमांक 18 मध्ये येणाऱ्या या परिसराकडे महानगरपालिकेचे आतापर्यंत दुर्लक्ष झाले आहे. जनतेला दरवर्षी टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. तेव्हा पाणी समस्या दूर करण्यासाठी ठोस पाऊल उचलावी, अशी मागणी करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बी. जी. घोडके, सरोजनी प्रधान, एस. ए. शहापुरी, शोभा गावडे, माहीन पिरजादे, हिना सौदागर, एन. बी. जायगोंड यांच्यासह परिसरातील नागरिक व महिला उपस्थित होत्या.
Home महत्वाची बातमी सुभाषनगरातील समस्या सोडवा
सुभाषनगरातील समस्या सोडवा
बेळगाव : सुभाषनगर येथे रस्ते, पाणी या समस्या भेडसावत आहेत. त्यामुळे येथील जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या दोन्ही समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. गेल्या काही वर्षांपासून या परिसरातील रस्ते पूर्ण खराब झाले आहेत. विशेष करून क्रॉस क्रमांक दुसरा येथे तर रस्त्यांवर मोठमोठे ख•s पडले […]