पेंडुर गवळदेव मंदिरास मनसेच्या वतीने सोलर लाईट प्रदान
कट्टा / वार्ताहर
मालवण तालुक्यातील पेंडूर रायवाडी येथे काही वर्षांपूर्वी गवळदेव मंदिर बांधण्यात आले आहे. याठिकाणी सोलर लाईटची सोय उपलब्ध करून द्यावी अशी मागणी येथील स्थानिक ग्रामस्थांनी मनसे मालवण यांच्याकडे केली होती. यांची पक्ष पातळीवर दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे पदाधिकारी व मालवण तालुका संपर्क अध्यक्ष नंदकिशोर तळावडेकर यांच्या माध्यमातून उपजिल्हा अध्यक्ष गणेश वाईरकर यांच्या हस्ते ही सोलर लाईट प्रशांत परब व सातेरी मंदिराचे सेवेकरी गुंडू राऊळ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्याबद्दल स्थानिक ग्रामस्थांनी मनसे पक्षाचे आभार मानले.
Home महत्वाची बातमी पेंडुर गवळदेव मंदिरास मनसेच्या वतीने सोलर लाईट प्रदान
पेंडुर गवळदेव मंदिरास मनसेच्या वतीने सोलर लाईट प्रदान
कट्टा / वार्ताहर मालवण तालुक्यातील पेंडूर रायवाडी येथे काही वर्षांपूर्वी गवळदेव मंदिर बांधण्यात आले आहे. याठिकाणी सोलर लाईटची सोय उपलब्ध करून द्यावी अशी मागणी येथील स्थानिक ग्रामस्थांनी मनसे मालवण यांच्याकडे केली होती. यांची पक्ष पातळीवर दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे पदाधिकारी व मालवण तालुका संपर्क अध्यक्ष नंदकिशोर तळावडेकर यांच्या माध्यमातून उपजिल्हा अध्यक्ष गणेश वाईरकर […]