शहापूर-पवार गल्ली येथील मातीचे ढीग हटविले
बेळगाव : शहापूर येथील पवार गल्लीमध्ये गेल्या दिवसांपासून मातीचे ढीग साचून होते. या मातीच्या ढिगांमुळे ये-जा करणे अवघड झाले होते. पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य पसरत होते. त्यामुळे वॉर्ड क्रमांक 27 मधील नगरसेवक रवी साळुंखे यांच्या पुढाकाराने हे मातीचे ढीग हटविण्यात आले आहेत. पावसाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आपल्या प्रभागाची स्वच्छता करणे महत्त्वाचे आहे. गेल्या काही दिवसांपासून पवार गल्लीमध्ये मातीचे ढीग साचून होते. गटारीतील कचराही रस्त्याच्या बाजुला तसाच पडून होता. त्यामुळे महानगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक शिल्पा कुंभार व ठेकेदार नितीन देमट्टी यांना याची माहिती देण्यात आली. त्यानंतर महानगरपालिकेचे काही कर्मचारी घेवून हे मातीचे ढीग आणि कचरा हटविण्यात आला आहे. यामुळे जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.
Home महत्वाची बातमी शहापूर-पवार गल्ली येथील मातीचे ढीग हटविले
शहापूर-पवार गल्ली येथील मातीचे ढीग हटविले
बेळगाव : शहापूर येथील पवार गल्लीमध्ये गेल्या दिवसांपासून मातीचे ढीग साचून होते. या मातीच्या ढिगांमुळे ये-जा करणे अवघड झाले होते. पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य पसरत होते. त्यामुळे वॉर्ड क्रमांक 27 मधील नगरसेवक रवी साळुंखे यांच्या पुढाकाराने हे मातीचे ढीग हटविण्यात आले आहेत. पावसाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आपल्या प्रभागाची स्वच्छता करणे महत्त्वाचे आहे. गेल्या काही दिवसांपासून […]