सुजाण नागरिक भाजपच्या पाठीशी

जगदीश शेट्टर यांचा विश्वास, माध्यम केंद्राचे उद्घाटन बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघातील सुजाण नागरिक शंभर टक्के भाजपला विजयी करतील. केवळ विजयीच नाही तर दोन लाख मतांच्या फरकाने मी खासदार होईन. आजवर बेळगावच्या विकासामध्ये दिलेल्या योगदानामुळे मतदार नक्कीच विजयी करतील, असा विश्वास माजी मुख्यमंत्री व भाजपचे लोकसभा उमेदवार जगदीश शेट्टर यांनी व्यक्त केला. शुक्रवारी लक्ष्मी कॉम्प्लेक्स, […]

सुजाण नागरिक भाजपच्या पाठीशी

जगदीश शेट्टर यांचा विश्वास, माध्यम केंद्राचे उद्घाटन
बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघातील सुजाण नागरिक शंभर टक्के भाजपला विजयी करतील. केवळ विजयीच नाही तर दोन लाख मतांच्या फरकाने मी खासदार होईन. आजवर बेळगावच्या विकासामध्ये दिलेल्या योगदानामुळे मतदार नक्कीच विजयी करतील, असा विश्वास माजी मुख्यमंत्री व भाजपचे लोकसभा उमेदवार जगदीश शेट्टर यांनी व्यक्त केला. शुक्रवारी लक्ष्मी कॉम्प्लेक्स, सदाशिवनगर येथील माध्यम केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर केएलईचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे, शंकरगौडा पाटील, भाजपचे राज्य उपाध्यक्ष अनिल बेनके, हणमंत निराणी, महांतेश कवटगीमठ, जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेसच्या एका वर्षाच्या सरकारमुळे सर्वसामान्यांची राज्यात पिळवणूक होत आहे. राज्यातील नागरिकांना एक स्थिर हवे असून नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील, असे शेट्टर ठामपणे म्हणाले. जगदीश शेट्टर यांनी शुक्रवारी बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघ व दक्षिण मतदारसंघात जोरदार प्रचार केला. सकाळी अनगोळ, भाग्यनगर, मृत्युंजयनगर या परिसरात मतदारांशी संवाद साधला. त्यानंतर शास्त्राrनगर, गुड्सशेड रोड, बिच्चू गल्ली तसेच बेळगाव उत्तर मतदारसंघातील काही भागांमध्ये प्रचार दौरा राबविण्यात आला.