लोकोळी येथे वडाच्या झाडाची कत्तल

पर्यावरणप्रेमी पाटील यांची वनखात्याकडे तक्रार खानापूर : लोकोळी-लक्केबैल रस्त्यालगत असलेल्या सुमारे सव्वाशे वर्षे जुन्या वडाच्या झाडाची कत्तल लोकोळी येथील तुकाराम भावणी आणि लक्ष्मण भावणी यांनी केली आहे. याबाबत लोकोळी येथील पर्यावरणप्रेमी प्रवीण पाटील यांनी याबाबत खानापूर वनखात्याकडे तक्रार दाखल केली आहे. तसेच याबद्दल खानापूर पोलीस ठाण्यात तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही तक्रार केली आहे. वडाचे झाड […]

लोकोळी येथे वडाच्या झाडाची कत्तल

पर्यावरणप्रेमी पाटील यांची वनखात्याकडे तक्रार
खानापूर : लोकोळी-लक्केबैल रस्त्यालगत असलेल्या सुमारे सव्वाशे वर्षे जुन्या वडाच्या झाडाची कत्तल लोकोळी येथील तुकाराम भावणी आणि लक्ष्मण भावणी यांनी केली आहे. याबाबत लोकोळी येथील पर्यावरणप्रेमी प्रवीण पाटील यांनी याबाबत खानापूर वनखात्याकडे तक्रार दाखल केली आहे. तसेच याबद्दल खानापूर पोलीस ठाण्यात तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही तक्रार केली आहे. वडाचे झाड हे सव्वाशे वर्षे जुने होते. तसेच या झाडाबाबत लोकोळी ग्रामस्थांचे धार्मिक आणि भावनिक नाते जोडलेले होते. मात्र भावणी कुटुंबीयांनी कोणतीही परवानगी न घेता या झाडाची कत्तल केली. यामुळे लोकोळी येथील पुरातन वारसा लोपला गेला आहे. तसेच या झाडामुळे पर्यावरणाचा ठेवाही नाश पावला आहे. यासाठी प्रवीण पाटील यांने याबाबत तक्रार करून भावणी बंधूंच्या विरोधात कठोर क्रम घेण्यात यावा तसेच पुढील काळात लोकोळी परिसरातील पर्यावरणाचे जतन करण्यात यावे, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.