एसकेई सोसायटीच्या कर्मचाऱ्यांची क्रिकेट स्पर्धा उद्यापासून
26 जानेवारीला उपांत्य आणि अंतिम सामना
बेळगाव : साऊथ कोंकण एज्युकेशन सोसायटीच्या कर्मचारीवर्गाची क्रिकेट स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेचे साखळी सामने येत्या 14 आणि 15 जानेवारी रोजी तर 26 जानेवारीला उपांत्य आणि अंतिम सामना खेळविण्यात येणार आहे. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून महाविद्यालयाच्या चिंतामणराव पटवर्धन मैदानावर होणाऱ्या या क्रिकेट स्पर्धेमध्ये एकूण 6 संघांनी सहभाग नोंदविला आहे. कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामकाजाबरोबरच विरंगुळा व प्रोत्साहन मिळावे. तसेच शारीरिक तंदुरुस्ती राखली जावी, हा या स्पर्धेमागील उद्देश आहे. त्यामुळे स्पर्धेत सहभागी कर्मचारी जोरात तयारीला लागले आहेत. शुक्रवारी पु. ल. देशपांडे खुला रंगमंच येथे एसकेई कर्मचारी चषकाचे अनावरण करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष किरण ठाकुर, अशोक शानभाग, ज्ञानेश कलघटगी, मधुकर सामंत, महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कर्मचारीवर्ग यांच्या उपस्थितीत हा चषक अनावरण सोहळा पार पडला.
Home महत्वाची बातमी एसकेई सोसायटीच्या कर्मचाऱ्यांची क्रिकेट स्पर्धा उद्यापासून
एसकेई सोसायटीच्या कर्मचाऱ्यांची क्रिकेट स्पर्धा उद्यापासून
26 जानेवारीला उपांत्य आणि अंतिम सामना बेळगाव : साऊथ कोंकण एज्युकेशन सोसायटीच्या कर्मचारीवर्गाची क्रिकेट स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेचे साखळी सामने येत्या 14 आणि 15 जानेवारी रोजी तर 26 जानेवारीला उपांत्य आणि अंतिम सामना खेळविण्यात येणार आहे. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून महाविद्यालयाच्या चिंतामणराव पटवर्धन मैदानावर होणाऱ्या या क्रिकेट स्पर्धेमध्ये एकूण 6 संघांनी सहभाग नोंदविला […]