सहा वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार,आरोपीला अटक
उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील सिकंदराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी शनिवारी ही माहिती दिली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिकंदराबाद पोलीस स्टेशन परिसरात राहणारी एक महिला शुक्रवारी रात्री आपल्या दोन मुलींसोबत झोपली होती आणि तिचा नवरा बाहेर गेला होता. पती घरी पोहोचला तेव्हा मोठी मुलगी घरात आढळली नाही, त्यानंतर कुटुंबीयांनी मुलीचा शोध सुरू केला. काही वेळाने त्यांना मुलगी सापडली. तिला रुग्णालयात नेण्यात आल्यावर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे आढळले.आरोपी ओळखीतला होता.
या माहितीवरून तात्काळ कारवाई करत, कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी मुलांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.पोलीस पुढील तपास करत आहे.
Edited By – Priya Dixit